March 5, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

कामाच्या धडाक्यात सीईओ कुलदीप जंगम यांची वर्षपूर्ती

सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पदभार घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. कामाच्या धडाक्यात सीईओ जंगम यांची एक वर्षाची कारकीर्द कशी संपली हे कोणाला कळालेच नाही. कर्मचारी हिताच्या अनेक निर्णयामुळे ते अधिक लोकप्रिय झाल्या असून कर्मचाऱ्यांचा त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा पदभार घेऊन 30 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण झाले. बुलढाण्याला कारकीर्द सुरू झालेले असतानाच विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांची सोलापूरला बदली झाली. पदभार घेतल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजाला त्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यानंतर त्यांनी कामाचा धडाका सुरू केला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे सुसूत्रीकरण, स्मार्ट अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्राचा कारभार, नवीन घरकुल, जागा नसलेल्या लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे,  नवीन घरकुलाला मंजुरी, बचत गटासाठी मॉल, कर्जाची उपलब्धता, उमेद मेळावा, स्वच्छ शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री शंभर दिवसाचा कार्यक्रम या उपक्रमाबरोबरच कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवले. यामध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती, पाच वर्षाहून अधिक काळ एकाच जागी असलेल्या कर्मचारी व ग्रामसेवक बदल्या, शिक्षकांच्या समायोजनाद्वारे बदल्या, पदोन्नती एका दणक्याने राबवल्या. जिल्हा परिषद कर्मचारी भरती, बदल्या, पदोन्नत्या करताना अत्यंत पारदर्शक पद्धत राबवली. यामुळे भ्रष्टाचाराला कोठेच वाव दिला नाही. त्यानंतर अनुकंपा भरती राबवली. जंगम यांचे हे मिशन राज्यभर चर्चेत राहिले.

आषाढी वारीचे नियोजन हे एक कुलदीप जंगम यांच्या अभ्यासाचे मोठे गमक म्हणावे लागेल. पदभार घेऊन थोडाच कालावधी झालेला असताना आषाढी वारीचे नियोजन करण्याचे त्यांच्यावर जबाबदारी आली. पहिल्यांदाच त्यांनी आषाढी वारी नियोजन व जबाबदारीचा मास्टर प्लॅन तयार केला. त्यामुळे कमालीची गर्दी होऊनही आषाढी वारी यशस्वी झाली. यात त्यांनी राबवलेले उपक्रम पथदर्शी ठरले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेची कामगिरी पुणे विभागात उत्कृष्ट ठरली आहे. त्यामुळे सीईओ जंगम यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

सोलापूरची ही आठवण कायम…

सोलापूरचा पदभार घेतल्यानंतरच कुलदीप जंगम यांच्या जीवनातील महत्त्वाचा क्षण म्हणजे त्यांचा विवाह सोहळा झाला. लग्नानंतर लगेच ते कर्तव्यावर हजर झाले. त्यांच्या जीवनसाथी डॉक्टर आहेत. त्यांनीही जिल्हा महिला बाल रुग्णालयात आपली सेवा सुरू केली आहे. जिल्हा महिला बाल रुग्णालयाने प्रसूती करण्याचा विक्रम केला आहे. त्यात डॉ. सौ. जंगम यांचेही योगदान आहे.