-
सोलापूर : ग्रामीण भागातील १३८ भूमीहीन बेघर लाभाथ्र्यांना घरकुल बांधकामासाठी जिल्हा परिषदेमार्फत गावठाण जागेतील प्रत्येकी ५०० चौ.फु. जागा विनामूल्य उपलब्ध करून दिली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे दिली.
जिल्ह्यात गावठाण या जागा उपलब्ध करून दिलेल्या लाभार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे आहे. माढा तालुक्यातील घोटी- १५, जामगाव- ०२ रोपळे खुर्द- ०१, मानेगाव- ०१, सोनंद- ०६, खैराव- ११, निमगाव दें. ०४, उपळाई खु. ०९, दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी- ०२, सिदखेड १, मंगळवेढा तालुक्यातील ढवळस- ०२, तळसंगी- १६, लवंगी- ०४, डोणज ०४, नंदूर- ०१, मोहोळ तालुक्यातील आष्टी- २२, सांगोला तालुक्यातील सोनंद- २७. माळशिरस तालुक्यातील निमगाव- ०९ असे एकूण १३८ भूमीहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी प्रत्येकी ५०० चौ.फु. जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसा आदेश संबंधित ग्रामपंचायतींना देण्यात आलेला आहे.
केंद्र व राज्य शासनाने सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबाना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वकांक्षी मोहिम हाती घेतली आहे. त्याअनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना इत्यादी योजनेंतर्गत ग्रामीण भागातील घरकुले बांधण्यासाठी प्रत्येकी रूपये १.२० लक्ष अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. तथापी या योजनेतील घरकुलास पात्र लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळणे पासून वंचीत राहत होते. ही बाब विचारात घेवून सिईओ मनीषा आव्हाळे यांनी मोहिम स्वरूपात भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्धता करण्यासाठी अभियान राबविले. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यात २हजार १२९ भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अद्यापही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या २ हजार ९० लाभार्थी जागेअभावी वंचीत असल्याचे व त्यांनाही नजीकच्या कालावधीत जागा उपलब्ध करून देवून गरीब लाभार्थ्यांचे घराचे स्वप्न साकार करणार असलेचे त्यांनी सांगीतले. याकामी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर व सर्व तालुक्यांचे गट विकास अधिकारी हे अविरत काम करीत आहेत.

More Stories
सोलापूर झेडपीत नवा पायंडा; तदर्थ पदोन्नतीद्वारे मर्जीतील कर्मचाऱ्यांना स्थान
मंद्रूप पोलीस ठाण्यात तहानलेल्या पक्षांसाठी सुरू केली पाणपोई
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळाले सीईओंच्याहस्ते पुरस्कार