सोलापूर : येथील भगिनी समाजतर्फे पूरग्रस्तांना भांड्यांची मदत करण्यात आली. उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्याकडे ही मदत सुपूर्द करण्यात आली.
यंदाच्यावर्षी जिल्ह्यात सीना नदीला आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबासाठी भगिनी समाजतर्फे निधी जमविला. या रकमेतून पूरग्रस्तांना मदत देण्यात आली. ही मदत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पूरग्रस्तांना पोचविण्यासाठी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी ट्रस्ट अध्यक्षा विशाला दिवाणजी, सचिवा सुवर्णा कटारे, भगिनी समाजच्या कार्याध्यक्षा राखी हैनाळ, सल्लागार विजया म्हमाणे, प्रेमलता वैद्य, प्रभा कोडले, अर्चना पवार आदी उपस्थित होते.

More Stories
सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट
जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या