सोलापूरजिल्हा परिषदसामाजिक

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ

सोलापूर: सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेल्या आवाहनानुसार महाराष्ट्रात राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदत करण्यात आली.

सिने ला आलेल्या महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील शेतकरी व 85 गावातील ग्रामस्थांसमोर संकट उभे राहिले. महापुरामुळे ग्रामस्थांना घरातून बाहेर राहावे लागत असल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी त्यांच्या भोजनाची व रेशनची व्यवस्था करण्यासाठी मोठे पाऊल उचलले. भोजनासाठी अक्षय पात्रा यांच्या संस्थेचे किचन सुरू केल्यानंतर सुमारे 15000 पूरग्रस्तांच्या दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था झाली. त्यामुळे या उपक्रमाला मदत करण्यासाठी  कर्मचारी महासंघाच्या वतीने 40100 रुपयाचा धनादेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना सुपूर्द करण्यात आला. हा निधी देण्यासाठी महासंघाचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, महासंघाचे माळशिरस तालुकाध्यक्ष टीम तर काही सेवा निवृत्त कर्मचारी यांच्याकडून स्वेच्छेने मदत उभी करण्यात आली. महापुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले. त्यामुळे सामाजिक जाणीव वेतन या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जो प्रस्ताव मांडला याला जिल्हा परिषदेच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यासाठी महासंघाचे दिनेश बनसोडे, धन्यकुमार काळे, प्रमोद धावड यांनी विशेष प्रयत्न केले. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना धनादेश देतेवेळी महासंघाचे दिनेश बनसोडे, राजेश देशपांडे, महेश केंद्रे, बसवराज दिंडोरे, बंडू मोरे, सुरेश राठोड, वाले, सागर शेंडगे, कानीफनाथ चव्हाण,राजेंद्र सोनकांबळे, इस्माईल सय्यद, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button