कुलदीप जंगम यांना आवडले बचत गटाच्या महिलांनी तयार केलेले आकाश कंदील

जिल्हा परिषदेच्या आवारात महिला बचत गटांनी तयार केलेल्या दिवाळी साहित्याची विक्री सुरू आहे. दिवाळीचे साहित्य या ठिकाणी खरेदी केल्यास महिला बचत गटाची दिवाळी आनंदाची होऊ शकते, असे मत कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले.

Rajkumar Sarole
1 Min Read

सोलापूर: उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहानी उत्पादित केलेल्या वस्तू,दिवाळी पदार्थ,हस्तकला वस्तू, पणत्या इत्यादी उत्पादनाचे प्रदर्शन व विक्रीसाठी आयोजित केलेल्या रुक्मिणी दिवाळी महोत्सव-2025 चे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी सीईओ जंगम यांचे बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या छोट्या आकाश कंदीलकडे लक्ष वेधले आणि स्वतःच्या दिवाळीसाठी त्यांनी तो आकाश कंदील खरेदी केला.

याप्रसंगी प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे उपस्थित होते.बचत गटांनी उत्पादित केलेला सुकामेवा, हस्तकला साहित्य, फराळाचे पदार्थ व चॉकलेट, पणत्या, आकाश कंदील यांची खरेदी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी स्वतः करून सर्व अधिकारी कर्मचारी यांना बचत गटाची उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी यावेळी सर्वच उपस्थित समूहातील महिला यांच्याशी सवांद साधून शुभेच्छा दिल्या.

या रुक्मिणी दिवाळी महोत्सवमध्ये सोलापूर जिल्ह्यातून नावीन्यपूर्ण उत्पादनाचे 33 स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलमध्ये महिला बचत गटांनी बनवलेल्या आकाश कंदील, दिवे, पणत्या, फराळाचे पदार्थ, सजावटीचे साहित्य, त्याचबरोबर लाकडी बैलगाडी लक्ष वेधून घेत होती.

हा महोत्सव पार पाडण्यासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, लेखाधिकारी शुभांगी देशपांडे, जिल्हा व्यवस्थापक राहुल जाधव, संतोष डोंबे,मीनाक्षी मडीवळी, दयानंद सरवळे, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक,प्रभाग समन्वयक परिश्रम घेत आहेत.

TAGGED:
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *