सोलापूर: पुणे विभाग पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यासाठी मतदार नोंदणी सुरू झाली आहे. तुम्ही पदवीधर असाल तर या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी खालील लिंक चा उपयोग करा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा या निवडणूक कार्यक्रमाच्या प्रसिद्धी नोडल अधिकारी स्मिता पाटील यांनी केले आहे.
शिक्षक व पदवीधर मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी तुम्हाला https://mahaelection.gov.in या वेबसाईट किंवा लिंकवर अपलोड करण्यासाठी खालील कागदपत्रांचे फोटो काढावेत /स्कॅन करावेत.
यासाठी आयडी साईज रंगीत फोटो,
आधार कार्ड,
मतदान कार्ड,
१नोव्हें २०२३ पर्यंतची पदवी प्रमाणपत्र / अंतिम वर्ष गुणपत्रिका/(डिग्री/डिप्लोमा/गुणपत्रिका)
नाव बदल असल्यास गॅझेट / विवाह नोंदणी प्रमाणपत्र / पॅनकार्ड
कोऱ्या कागदावर सही करून फोटो काढून ठेवावा
वरील सर्व कागदपत्रे फोटो /स्कॅन स्वरूपात आपल्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप/कॉम्प्युटर वर घ्यावीत.
त्यामुळे आपण पदवीधर असाल तर वेळ वाया न घालवता आजच नोंदणी करा!
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्र)
जिल्हा परिषद, सोलापूर
तथा
SVEEP नोडल अधिकारी
पदवीधर व शिक्षक मतदार

