सोलापूर : अतिवृष्टीमुळे सिना नदीला आलेल्या पुरामध्ये शालेय विद्यार्थी यांचे शालेय साहित्य वाहून गेलेले होते. या विद्यार्थ्यांना परिपूर्ण शालेय साहित्य देवुन उमेद अभियानाने केलेले सामाजिक काम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांनी केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पूरग्रस्त विद्यार्थी यांना शालेय साहित्य देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन सामाजिक संस्था, उद्योजक तसेच वेगवेगळ्या कार्यालय यांना केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत स्वयंसहायता समूहमधील सदस्य, अभियानातील कर्मचारी यांनी स्वखुशीने निधी जमा करून करमाळा तालुक्यातील 7 गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी यांना 700 शालेय कीटचे वाटप केले. करमाळा तालुक्यातील पूरग्रस्त असलेले बाळेवाडी व पोथरे या दोन्ही गावातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, सुषमा बिचुकले, गणेश पाटील, आण्णा आवताडे, उमेश डांगे, तालुका व्यवस्थापक योगेश जगताप, दिगंबर साळुंखे, चंद्रकांत माने उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप म्हणाले की, सदर शैक्षणिक साहित्य हे चांगल्या दर्जाचे असून त्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून अधिकारी होवून आपल्या आई वडील व शाळेचे नाव वेगळ्या उंचीवर घेवुन जावे.
यावेळी बोलताना उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे म्हणाले की,शालेय विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढवावे, पूरग्रस्त गावातील जिल्हा परिषद शाळेतील एकही विद्यार्थी शालेय साहित्यविना वंचित राहू नये, त्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केलेल्या आवाहनाला उमेद अभियानाचे सर्व कर्मचारी व स्वयंसहायता समूहातील महिला यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला . उमेद अभियानाच्यावतीने जवळपास 4.50 लाख रुपये किंमतीचे चांगल्या दर्जाचे शालेय साहित्य 700 विद्यार्थी यांना वाटप करून सामजिक कार्यात सहभागी झाल्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी करमाळा तालुक्यातील उमेद अभियानातील तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक, समूहातील महिला उपस्थित होत्या.
कीटमध्ये हे साहित्य
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या शालेय किटमध्ये 1 बॅग,12 वह्या, पेन, कंपास, चित्रकला वही, पाटी असे साहित्य आहे.
More Stories
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दाखवली कला
सोलापूर झेडपीतील चार कर्मचाऱ्यांना पदोन्नती
राजन पाटील यांनी ट्रम्पच्या पक्षात जावे; आमदार राजू खरे यांचा सल्ला