February 1, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

आज दारातील पौर्णिमा… तुम्हाला महत्व माहित आहे का?

सोलापूर : मित्रांनो तुम्हाला माहित आहे का? आज दारातील पौर्णिमा आहे. दारातील पौर्णिमा म्हणजे ऐकून आश्चर्य वाटले असेल ना. पण शेतकऱ्यांच्या जीवनात या पौर्णिमेला महत्त्व आहे. शेतकरी कुटुंबात गोडधोड करून ही पौर्णिमा आज साजरी केली जाते. चला तर मग जाणून घेऊया ही दारातील पौर्णिमा म्हणजे काय?

मित्रांनो आज 2 फेब्रुवारी 2026. आज माघ महिन्यातील पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असेही संबोधले जाते. पण महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबात या पौर्णिमेला दारातील पौर्णिमा असे संबोधले जाते. आपण कोजागिरी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमा  साजऱ्या करतो. तशी ही माग महिन्यातील पौर्णिमा.

पौर्णिमेचे महत्त्व: धार्मिक: पौर्णिमेला भगवान विष्णू, लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने आर्थिक भरभराट होते असे मानले जाते. वैज्ञानिक: पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला मोठी भरती येते कारण चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती जास्त असते.उपाय: या दिवशी सत्यनारायणाची पूजा किंवा उपवास करणे शुभ मानले

आता प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व…

चैत्र हनुमान जयंती या दिवशी हनुमानाचा जन्म झाला असे मानले जाते.

वैशाख बुद्ध पौर्णिमा तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण या दिवशी झाले.

ज्येष्ठ वटपौर्णिमा विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करतात.

आषाढ गुरुपौर्णिमा आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि व्यासांची पूजा करण्याचा दिवस.

श्रावण राखी पौर्णिमा बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक आणि कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा सण.

भाद्रपद अनंत चतुर्दशी पितृ पक्षाची सुरुवात आणि गणपती विसर्जन.

आश्विन कोजागिरी पौर्णिमा याला ‘शरद पौर्णिमा’ म्हणतात. रात्री लक्ष्मी पृथ्वीवर येते अशी मान्यता आहे; चंद्राच्या प्रकाशात दूध आटवून पितात.

कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला. या दिवशी देव दिवाळी साजरी केली जाते.

मार्गशीर्ष दत्त जयंती भगवान दत्तात्रयांचा जन्म या तिथीला झाला.

पौष शाकंभरी पौर्णिमा देवी शाकंभरीचा उत्सव आणि पवित्र नद्यांमध्ये स्नानाचे महत्त्व.

माघ माघी पौर्णिमा या दिवशी गंगा स्नानाचे आणि दानाचे मोठे महत्त्व आहे.

फाल्गुन होळी पौर्णिमा हुताशनी पौर्णिमा; या दिवशी होळी पेटवून वाईट विचारांचे दहन केले जाते.

माघ पौर्णिमा….

माघ पौर्णिमेचे महाराष्ट्रात वेगळे वैशिष्ट्य आहे. शेतकरी कुटुंबात दारातील पौर्णिमा म्हणून ही पौर्णिमा साजरी केली जाते. या पौर्णिमेला शेतातील भारत आलेले पिके दारात पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. सध्या गहू ज्वारी करडई ही पिके बहरात असतात. दारात ज्वारीची ताटे, गव्हाच्या लोंब्या, करडईचे फुले उभारून पूजा केली जाते. शेतात बहरात आलेल्या पिकाची म्हणजेच लक्ष्मीची ही पूजा मांडली जाते. या काळात धान्याच्या रूपाने लक्ष्मी घरात येते. त्यामुळे लक्ष्मी घरात येण्याच्या स्वार्थासाठी दारातील पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो. आज खेड्यात जाऊन तुम्ही शेतकऱ्यांच्या घरासमोर जाऊन पाहिल्यास ही पूजा मांडल्याचे दिसून येते. चला तर मग आज आपणही पुरणपोळीचा आस्वाद घेऊया.