सोलापूर : येथील उद्योजक व परफेक्ट कोटचे मालक तारासिंह शिवलाल राठोड यांना बंजारा इंटरनॅशनल कल्चरल ॲड एंटरटेनमेंटकडून मानद डाॅक्टरेट पदवी व बंजारा इंटरनॅशनल सोशल ॲवार्ड देऊन गौरविण्यात आले.
शारजा (दुबई) येथील सफारी माॅलमध्ये हा कार्यक्रम झाला. राठोड हे सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे माजी चेअरमन व सोलापूर इंडस्ट्रीयल असोसिएशनचे संचालक आहेत. उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी सोलापूरमध्ये चांगला जनसंपर्क उभा केला आहे. त्यांना मानक पदवी व बंजारा इंटरनॅशनल सोशल अवॉर्ड मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध