February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मराठा सेवा संघाने समाजाला वैचारीक शिवजयंती दिली: आमदार अभिजीत पाटील

सोलापूर: मराठा सेवा संघाने समाजात काम करत असताना शिवजयंती कशी साजरी करावी याची समाजाला दिशा दिली, शिवजन्मोत्सवाच्यानिमित्ताने प्रकाशित केलेला शिवसंदेश-शिवजयंती विशेषांक तालुक्यातील तरूण पिढीने अवश्य वाचावा व तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा आदर्श घेत व्यसनमुक्त रहावे, असे मत आमदार अभिजित पाटील यांनी शिवसंदेश साहित्य-संस्कृती फाऊंडेशनच्या शिवसंदेश-शिवजयंती विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना व्यक्त केले.

आमदार अभिजित पाटील यांनी शिवसंदेश टिमचे कौतुक करीत हा विशेषांक वाचनीय व संग्रही ठेवावा, असा असल्याचे सांगत वैचारिक शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. यावेळी बाळासाहेब पाटील, ऋतुराज सावंत, सचिन जगताप, डॉ. धनाजी खताळ, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांची भाषणे झाली. व्याख्याते खंडुजी डोईफोडे यांचे शिवव्याख्यान संपन्न झाले.

शिवसंदेश साहित्य-संस्कृती फाऊंडेशनच्यावतीने शिवजन्मोत्सवाच्यानिमित्ताने टेंभुर्णीत शिवसंदेश-शिवजयंती विशेषांकाचा प्रकाशन सोहळा माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील, ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, जेएसपीएमचे चेअरमन ऋतुराज सावंत यांच्या शुभ हस्ते पार पडला. यावेळी शिव व्याख्याते खंडुजी डोईफोडे, उद्योजक विजय देशमुख, डॉ.धनाजी खताळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादासाहेब देशमुख, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जगताप, तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब वागज, माळशिरस तालुका अध्यक्ष दिगंबर मिसाळ, उपाध्यक्ष सचिन पराडे, नागेश व्यवहारे, सचिन महिंगडे , प्रताप काळे, प्रशांत जगताप यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिवसंदेश विशेषांकासाठी व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसंदेशचे शंकर नागणे,अविनाश नांगरे,विजय काळे ,गणेश गोंदिल,अस्लम तांबोळी ,ऋषिकेश भंडारे,प्रशांत खंडागळे,ओंकार पाटील, आसिफ शेख,शुभम मोरे,जोतीराम बागवले,साहिल ताबे,गजेंद्र पंडित, हर्षद मोरे,विजय गायकवाड,विजय मोरे ,महेश ढगे,वैभव पवार ,गणेश जगताप,रणजीत मोरे,जयंत खंडाळे, प्रदीप कटवटे, सुदर्शन पंपटवार यांनी परिश्रम घेतले.

मंडळाचा केला सन्मान…

शिवसंदेश साहित्य-संस्कृती फाऊंडेशनच्यावतीने शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने दिवसभर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा व शिवसंदेश विशेषांक भेट देण्यात आला. प्रकाशन सोहळ्यात माजी सैनिक, गुणवंत विद्यार्थी, गेल्यावर्षी वैचारीक शिवजयंती साजरी करणाऱ्या मंडळांचा सन्मान करण्यात आला.