सोलापूर : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस मुख्यालय येथे पोलीस दलातील अधिकारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये डॉ हेमंत लोढा यांनी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी केली. या आरोग्य शिबिरामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस घटकातील सुमारे 200 पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उपस्थिती दर्शवली. डॉ हेमंत लोढा यांनी त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार केले. तसेच त्यांना रुद्राक्ष थेरपी देण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले की या शिबिरात शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले असून पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक.कुंभार, पोवार, देशपांडे, सहा पोलीस निरीक्षक,कदम, जकिकोरे तसेच रापोनि कांबळे उपस्थित होते.

More Stories
wari: वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी 342 अधिकारी 3528 हजार पोलीस पंढरपुरात तैनात
सोलापूर झेडपी: फार्मासिस्टच्या बोगस प्रमाणपत्राची चौकशी करून कारवाई करणार
फार्मासिस्टला शहरात नियुक्तीसाठी सोलापूर झेडपीकडून विभागीय आयुक्तांची दिशाभूल