सोलापूर : रचना ऑफिसर्स सोशल असोसिएशन (ROSA) आयोजित नविन कार्यकाकारिणी सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला. सामाजिक बांधिलकी, एकोप्याची भावना आणि संघटनबळ दृढ करण्याचा संदेश देत रोसाच्या अध्यक्षपदी संजय धनशेट्ठी यांची निवड जाहीर करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी समाजातील ऐक्य आणि संघटित शक्तीचे महत्त्व अधोरेखित करत रोसाच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी नगरसेविका श्रीदेवी फुलारे,संगिता जाधव, चाबुकस्वार यांची विशेष उपस्थिती होती. यांचा सन्मान रोसाचे प्रमुख विठ्ठल दांडगे यांच्याहस्ते करण्यात आला.
यावेळी रोसाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विठ्ठलराव दांडगे, सुरेश पाखरे, मुख्य अभियंता मेट्रो ठाणे,डॉ. विश्वनाथ शिंदे धुळे,तसेच सोलापूर कार्यकारिणीचे नवनियुक्त अध्यक्ष संजय धनशेट्टी यांनी संघटनेची कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि भविष्यातील वाटचाल यावर सखोल मार्गदर्शन केले. समाजहिताचे उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकशाहीर रमेश खाडे यांनी केले.
यावेळी रोसा सोलापूरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवडण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे. मुख्य मार्गदर्शक डॉ. विश्वनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.अध्यक्ष- संजय धनशेट्टी, कार्याध्यक्ष – प्रल्हाद कांबळे, उपाध्यक्ष – अशोक कांबळे, उपाध्यक्ष – प्रा.डॉ. वसंत कोरे, सचिव – रमेश खाडे, सहसचिव- सुनील राजमाने, चेतन वाघमारे, खजिनदार- रविशंकर हत्याळीकर, सहखजिनदार – कृष्णा कबाडे, हरीश सपताळे. मार्गदर्शक- सिध्दाराम सनके, अरूण शिखरे, सिध्दाराम चाबुकस्वार, दत्तात्रय शिंदे, अंगुले, शैलेश खडतरे,महेश रायबान Arto, प्रसिद्धीप्रमुख – विश्वनाथ व्हनकोरे.

More Stories
मी शेतकऱ्याचा मुलगा, इनोव्हासाठी कशाला हट्ट करेन…
अशोक खरातच्या सोलापुरातील जमीन खरेदीबाबत वेगळीच माहिती समोर
मोफत उपचारासाठी लाचेची मागणी; मंगळवेढ्यात डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध गुन्हा