सोलापूर : उत्तर सोलापुरातील तळे हिप्परगा येथील शॉवर अॅन्ड टॉवर वॉटर पार्कमध्ये पोहताना अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडलेल्या दहा वर्षीय मुलीचा उपचारासाठी नेताना मंगळवारी दुपारी मृत्यू झाला.
इकरा मोहम्मद गौस भागानगरी (वय १०, रा. मुस्लिम पाच्छा पेठ) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
मंगळवार, दि. १९ मे रोजी इकरा ही आपल्या पालकांसोबत वॉटर पार्कला गेली होती. पाण्यात खेळताना तिला अचानक चक्कर आली. ही बाब तिने नातेवाइकांना सांगितली. यामुळे तिच्या पालकांनी तिला तातडीने उपचारासाठी सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलिस ठाण्याचे सपोनि विष्णू गायकवाड, पोलिस हवालदार आर. डी. दुधाळ यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन प्राथमिक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. या प्रकरणाची जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध