सोलापूर : कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य, जिल्हा शाखा सोलापूरच्या वतीने आयोजित जिल्हा मेळावा शनिवारी मोठ्या दिमाखात फडकुले सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात फुले, शाहू व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष गणेश मडावी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डी.डी.मस्के यांनी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या कामगारांच्या हितासाठी केलेली कामे सांगून आजच्या स्थितीत कर्मचाऱ्यांची संख्या कशी कमी कमी होत आहे याचे विश्लेषण केले.
अध्यक्षीय भाषणात गणेश मडावी यांनी पदोन्नती मधील आरक्षण मिळविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.शेवटी जिल्हाध्यक्ष मनीष सुरवसे यांनी मागण्या वाचून दाखवून त्याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अरुण क्षिरसागर यांची ॲट्रॉसिटीच्या दक्षता समितीवर अशासकीय सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल ट्रॉफी व सन्मानचिन्ह देऊन तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुमित भुईगळ, उपाध्यक्ष गिरीश जाधव, अति.सचिव डॉ. बाळासाहेब व्हनकंडे तर जिल्हा महासंघाचे अरविंद जेटीथोर जिल्हा सरचिटणीस, विजयकुमार लोंढे कोषाध्यक्ष, लक्ष्मण गायकवाड मुख्य संघटक, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अरुण भाऊ क्षिरसागर, महसूल शाखेचे अध्यक्ष प्रशांत भडकुंबे, उपाध्यक्ष सुधाकर राजगुरू, प्रशांत सुरे, सिव्हिल शाखेचे अध्यक्ष सचिन सोनवणे, जलसंपदा शाखेचे अध्यक्ष शरण अहिवळे, रवींद्र टकले, शशिकांत माने, विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष रवी शिंदे, डॉ शिरीष बंडगर, रवींद्र हिप्परगे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव, दिव्यांग शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र अंतुले, पंढरपूर नगर परिषद शाखेचे अध्यक्ष किशोर खिलारे आदी पदाधिकारी व संलग्न शाखांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप