सोलापूर : महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांना राज्यस्तरीय “आदर्श शिक्षक भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याण दळे, खासदार प्रणिती शिंदे यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक वैभव शेटे यांच्यासह विविध मान्यवर, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्यानिमित्ताने महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने वधू-वर सूचक मेळावा तसेच सामुदायिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्यात आले होते. समाजातील एकोप्याला आणि सामाजिक बांधिलकीला बळ देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. प्रा. डॉ. बापूसाहेब आडसूळ यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा सन्मान देण्यात आल्याने विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

More Stories
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘निर्मलवारी-समृद्धवारी’ व ‘चरणसेवा’ उपक्रमाचा समारोप