सोलापूर : महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त, भारत सरकार I.S.O मानांकन प्राप्त राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र राज्य 15 जूनपासून पूर्ण राज्यभरामध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असून सर्व विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश घ्यावा, असे आव्हान राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षा मुख्य प्रवर्तक, सदस्य पुणे बोर्ड,सदस्य मंत्रालय समन्वय समिती मुंबई,प्रदेशाध्यक्ष एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना महाराष्ट्र राज्य,संस्थापक चेअरमन स्वाभिमानी शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ यांनी केले आहे
या परीक्षेसाठी राज्यातून दोन ते तीन लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील असा अंदाज आहे. ही परीक्षा इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार परीक्षा केंद्र असतील. या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग पूर्ण राज्यभरामध्ये कार्यरत आहेत. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याहस्ते या पुस्तिकेचे प्रकाशन होऊन प्रवेश प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेचे मुख्य प्रवर्तक प्रा डॉ बापूसाहेब आडसुळ यांनी दिली आहे.
राज्यस्तरीय ज्ञानदीप प्रज्ञाशोध परीक्षेसाठी 15 जूनपासून प्रवेश प्रक्रिया

More Stories
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी
मनोज म्हेत्रे प्रकरणावर सीईओ कुशल जैन यांचा पडदा