सोलापूर : ठाणे शिक्षक मतदार संघाचे भाजपचे आमदार ज्ञानेश्वर म्हेत्रे हे आज सोलापूर जिल्हा परिषदेत शिक्षकांची बैठक घेण्यासाठी आले असता मराठा आंदोलकांनी त्यांची बैठक उधळून लावली.
आमदार म्हात्रे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात शिक्षक संघटनेची बैठक घेत असताना एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत काहीजण आले आणि आमदार म्हात्रे यांची बैठक उधळत त्याना तेथून जाण्यास भाग पाडले. त्यानंतर आमदार म्हात्रे यांनी शिक्षकासंबंधी बैठक घेण्यासाठी जिल्हा परिषदेत आले. जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांशी चर्चा करून ते खाली येत असताना पुन्हा मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला व जिल्हा परिषदेतून बाहेर पडेपर्यंत घोषणाबाजी केली.

More Stories
ग्रामीण भागातील गरोदर महिलांना मोफत सोनोग्राफी सुविधा
मंगळवेढा न्यायालयाने विनयभंगाच्या गुन्ह्यात सुनावली आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
सोलापुरात हिरकणी बसची ट्रकला धडक चालकासह महिला प्रवासी ठार