सोलापूर सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी मोनिका ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची बदली झाल्यामुळे हे पद रिक्त होते. आता त्यांच्या रिक्त जागेवर पुणे महानगरपालिका प्राधिकरणच्या सह आयुक्त मोनिका सुरजपालसिंह ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल व वन विभागाचे उपसचिव गावडे यांनी ठाकूर यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.