सोलापूर : मराठा सेवा संघ प्रणित तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाची शहर व जिल्हा कार्यकारणी जाहीर झाली आहे. हरिश्चंद्र कदम शहराध्यक्ष तर अरविंद मोटे यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मोहोळ, उत्तर सोलापूर ,दक्षिण सोलापूर ,बार्शी आणि अक्कलकोट तालुक्याचे तालुकाध्यक्ष देखील जाहीर करण्यात आले. मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित छत्रपती महोत्सव उपक्रमांतर्गत या निवडीचे पत्र उपस्थितांना देण्यात आले.
मराठा सेवा संघाच्या वतीने 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंतीपासून ते राजाराम महाराज जयंतीपर्यंत छत्रपती महोत्सव आयोजित केला जातो. या उपक्रमाअंतर्गत मंगळवार दि. 20 फेब्रुवारी रोजी सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी विचार पीठावर मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील,सोलापूर जिल्हा अध्यक्ष डॉ. जी. के .देशमुख, महानगर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, समन्वयक दत्ता मुळे, उपाध्यक्ष सदाशिव पवार, निर्मला शेळवने, संभाजी ब्रिगेडचे प्रकाश ननवरे, रमेश जाधव, पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांची उपस्थिती होती.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून जिजाऊ वंदना घेण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत पत्रकार कक्षाच्यावतीने करण्यात आले. याप्रसंगी सोलापूर शहराध्यक्ष म्हणून हरिश्चंद्र कदम यांना तर कार्याध्यक्ष म्हणून अरविंद मोटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. तसेच उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष म्हणून संदीप गायकवाड, अक्कलकोट तालुकाध्यक्षपदी प्रशांत भगरे, मोहोळ तालुकाध्यक्षदी देविदास नाईकनवरे, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी संजीव इंगळे, बार्शी तालुकाध्यक्षपदी गणेश क्षीरसागर यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचेपत्र प्रदान करण्यात आले.
प्रारंभी तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविकमध्ये कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली. तानुबाई बिरजे पत्रकार कक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील यांच्या सूचनेनुसार ही कार्यकारणी गठीत केल्याचे त्यांनी सांगितले
त्यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील,विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील यांची भाषणे झाली. प्रशांत माने आणि पांडुरंग सुरवसे यांनी सत्कारास उत्तरे दिली.
त्यानंतर विविध दैनिक, वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या संजय जाधव, राजकुमार सारोळे, अरविंद मोटे, अनिल कदम, उमेश कदम,कृष्णकांत चव्हाण, संजय पवार, प्रशांत माने , दिनेश शिंदे, प्रमोद बोडके, राकेश कदम, राजकुमार माने , विशाल भांगे, संतोष पवार,सागर सुरवसे,सूर्यकांत आसबे, हरिभाऊ कदम, संदीप वाडेकर,मनीष केत, नितीन ठाकरे,धनंजय मोरे, रामदास काटकर, वैभव गगणे, विजय बाबर, पांडुरंग सुरवसे, महेश हणमे, अविनाश गायकवाड या पत्रकारांचा सन्मानपत्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन गौरव करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सदाशिव पवार यांनी केले.
तानुबाई बिरजे पत्रकार कक्षातर्फे सोलापुरातील पत्रकारांचा सन्मान

More Stories
माढा तालुक्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फलोत्पादन मंत्री गोगावले यांच्याकडून पाहणी
सोलापुरात रमजान ईद उत्साहाने साजरी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त सोलापुरात आध्यात्मिक मानवंदना