‘जलजीवन” चे 21 हजार जिंकले चंदना भोसले, साहिल कांबळे यांनी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पस्पर्धे कनिष्ठ गटात पोखरापूरच्या चंदना भोसले व वरिष्ठ गटात अक्कलकोटचा साहिल कांबळे हे पहिल्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तालुक्यात कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटात पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकांसाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) अमोल जाधव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, परिक्षक प्रा.राजशेखर शिंदे , प्रा.संघप्रकाश दुड्डे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे, मनुष्यबळ विकास सल्लागार शंकर बंडगर, क्षमता बांधणी सल्लागार महादेव शिंदे, प्रशांत दबडे, दिपाली व्हटे, अर्चना कणकी, यशवंती धत्तुरे, अल्फिया बिराजदार यांच्यासह बी.आर.सी.व सी.आर.सी.यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी दोन्ही गटातील स्पर्धकांनी पाणी वाचवा , पाणी गुणवत्ता, जलसंवर्धन तसेच शाश्वत पाणी पुरवठा योजना याविषयी विचार व्यक्त केले.या स्पर्धेमधील कनिष्ठ महाविद्यालयीन गटात जगदंबा विद्यालय पोखरापूरची चंदना भोसले, करमाळा येथील महात्मा गांधी विद्यालयाची श्रेया अनिल गलांडे व मंगळवेढा तालुक्यातील सलगर येथील विद्यामंदिर हायस्कूल व काॕलेजची धानेश्वरी स्वामी तसेच वरिष्ठ गटात अक्कलकोट येथील सी.बी.खेडगीज महाविद्यालयाचा साहिल कांबळे, करमाळ्यातील प्र.मो.पा.महाविद्यालयाची दिव्या सुपेकर व यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा आबुब शेख हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकासाठी विजेते ठरले.यावेळी जिल्ह्यात वक्तृत्व स्पर्धेमधील विजेत्या स्पर्धकांबरोबर सहभागी सर्व विद्यार्थ्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना शाश्वता, पाणी वाचवा, पाण्याची बचत, पाणी गुणवत्ता याविषयी ग्रामस्थांमध्ये चांगल्या पद्धतीने जनजागृती करण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी केले.सदर स्पर्धेचे परिक्षण दयानंद महाविद्यालयाचे प्रा.राजशेखर शिंदे, संगमेश्वर महाविद्यालयाचे प्रा.संघप्रकाश दुड्डे व पाणी गुणवत्ता सल्लागार दिपाली व्हटे यांनी केले सूत्रसंचालन महादेव शिंदे यांनी केले तर आभार सचिन सोनवणे यांनी मानले.
स्पर्धेचा निकाल असा…
जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा कनिष्ठ गट – चंदना भोसले ( प्रथम पारितोषिक २१ हजार रुपये ) ,श्रेया गलांडे ( द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये ) व धानेश्वरी स्वामी ( तृतीय पारितोषिक ५ हजार पाचशे रुपये )
वरिष्ठ गट – साहिल कांबळे ( प्रथम पारितोषिक २१ हजार ), दिव्या सुपेकर ( द्वितीय पारितोषिक ११ हजार रुपये ), आबुब शेख ( तृतीय पारितोषिक ५ हजार पाचशे रुपये )