March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

तृप्ती अंधारे लातूर तर महारुद्र नाळे रायगडचे शिक्षण अधिकारी

सोलापूर: राज्यातील उपशिक्षणाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्या असून सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांची लातूर योजना तर महारुद्र नाळे यांची रायगडचे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे.

तृप्ती अंधारे यांच्याकडे सध्या सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून पदभार होता. आता त्यांची लातूरचे योजना शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नतीवर बदली झाली आहे. उपशिक्षणाधिकारी नाळे यांची पदोन्नतीवर रायगडच्या माध्यमिक शिक्षण अधिकारी म्हणून बदली झाली आहे. प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी संजय जावीर हे सध्या पदोन्नती बदलीच्या प्रतीक्षेत आहेत.  सेवा जेष्ठता यादीत फेरफार झाल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.  न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिल्यामुळे सेवा जेष्ठता यादीत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. पण या पदोन्नतीच्या यादीत त्यांचे नाव आलेले नाही.

पहा कुणाची कुठे बदली…