सोलापूर : जागतिक महिला दिनी सुट्टी असतानाही कार्यरत महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सन्मान करण्यात आला.
महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असतानाही कामाची निकड, आचारसंहिता व वर्षाखेर याचे भान ठेवून शासनाच्या सेवेची निकड लक्षात घेऊन आज सोलापूर जिल्हा परिषदमध्ये कार्यरत सर्व महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान युनियनच्यावतीने फेटा बांधून व रोप देऊन जिल्हा कार्यक्रमाधिकारी महिला बालकल्याण प्रसाद मिरकले यांच्याहस्ते मुख्य लेखा व वित अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्या उपस्थित करण्यात आला. शिक्षणाधिकारी कादर शेख यांचाही वाढदिवसानिमित्त सन्मान करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्याहस्ते सर्व महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. प्रसाद मिरकले यांनी आज जागतिक महिला समृध्दी धोरण स्वीकारणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील चौथे राज्य असून महिलांच्या कल्याणासाठी काम करत आहे. त्याची प्रचिती सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये येत आहे असे प्रतिपादन केले . मीनाक्षी वाकडे यांनी महिला सर्वप्रथम कर्तव्याला प्राधान्य देतात. त्यामुळे आज युनियनच्यावतीने सन्मान करण्यात आला हे निश्चित आमच्यासाठी कौतुकास्पद आहे, अशा भावना व्यक्त केल्या. कादर शेख यांनी महिलांचा केवळ आजच्या दिवशी सन्मान न करता सातत्याने महिलांचा व त्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांची प्रमुख उपस्थिती होती. रेणुका प्रथमशेट्टी,सुनीता भुसारे, रजनी केकडे,श्रीमती पोरेड्डी, माहमुरे,अर्चना निराळी, स्वाती गायकवाड, अंजली पेठकर आदी 11 महिलांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवली तर सूत्रसंचालन डॉ. एस. पी. माने आणि आभार प्रदर्शन रोहित घुले यांनी केले. याप्रसंगीपी सी .कवीटकर ,बी.सी. वाले,चेतन वाघमारे, भूषण काळे,दीपक सोनवणे, देविदास म्हेत्रे,संतोष ठाकूर, शशी ढेकळे,संदीप खरबस, विलास मसलकर, दत्तात्रय घोडके,श्रीशैल देशमुख, राजीव गाडेकर, राकेश सोडी, संतोष शिंदे,अधटराव आदी उपस्थित होते .