सोलापूर : जिल्हा परिषदेत महाराणा प्रताप यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
शिवरत्न सभागृहात आयोजित कार्यक्रमात बांधकाम क्रमांक दोनचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांच्याहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी महाराणा प्रताप यांच्या जीवनाविषयी माहिती व त्यांच्या शौर्य कथा सांगितल्या. महाराणा प्रतापसिंह बालपणापासूनच शूरवीर होते. त्यांनी मोघलांना हैराण करून सोडले होते. त्यांच्या शौर्याच्या गोष्टी सर्वांना माहीत व्हाव्यात यासाठी निवडक कथांचा पाठ्यपुस्तकात समाविष्ट व्हावा यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी अविनाश गोडसे, विवेक लिंगराज, सचिन कांबळे यांच्यासह बांधकाम क्रमांक दोनमधील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. इतर अधिकाऱ्यांची मात्र अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली. शासनाने महापुरुषांच्या जयंती साजरी कराव्यात असे फर्मान सोडले आहे. असे असतानाही बरेच अधिकारी या कार्यक्रमांना दांडी मारताना दिसून येत आहेत. याबाबत वरिष्ठांनी संबंधितांना तंबी द्यावी अशी चर्चा जिल्हा परिषदेत ऐकावयास मिळाली.
कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांचे भाषण सविस्तर ऐका…