सोलापूर : गावस्तरावरील प्लास्टिक कचरा संकलित करून रस्ते बांधकामामध्ये वापरणे यापुढे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

जिल्ह्यात सद्यस्थितीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार, प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर प्लास्टिक साठवण शेड व तालुकास्तरावर प्लास्टिक प्रक्रिया केंद्र उभारण्याचे काम हाती घेण्यात आली आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेने प्लास्टिकचा वापर कमी करणेसाठी प्रबोधन करणे सुरू केले आहे. याचाच एक भाग म्हणून संकलीत झालेले प्लास्टिकचा वापर रस्त्याच्या कामात होणेसाठी जिल्हा परिषदेचे बांधकाम विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागास लेखी पत्राद्वारे सिईओ जंगम यांनी सुचना दिल्या आहेत.

जिल्हात तालुकास्तरावर प्लास्टिक प्रक्रिया केंद्र सुरू करणेसाठी प्रक्रिया सुरू आहे. गावस्तरावरील संकलित होणारे व पुनरप्रक्रिया योग्य प्लास्टिक प्रक्रियाअंतर्गत तुकडे करणे, बेल, ग्यानुल बनवणेची प्रक्रिया सुरू आहे.

पुनरवापर अंतर्गत प्लास्टिकचा उपयोग रस्ते बांधकामामध्ये करणे अनिवार्य करणेत आले आहे.  जिल्ह्यातील तालुकास्तरीय प्रक्रिया केंद्र कार्यान्वित झाल्यानंतर संबंधित प्रक्रिया केंद्रातील उपलब्ध प्लास्टिकचा अहवाल स्वच्छ भारत मिशन कक्षात घेऊन जिल्ह्यातील प्लास्टिक डांबरी रस्ते निर्मितीमध्ये वापर होणेसाठी नियोजन करण्यात येणार आहे. .

जिल्ह्यामध्ये प्लास्टिक वापर करून तयार करण्यात आलेले डांबरी रस्ते अहवाल जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाकडे सादर करणेचे सुचना सिईओ जंगम यांनी दिले आहेत. याबाबत प्लास्टिक संकलन व प्रकिया करणेसाठी क्लस्टर करणेत येत असल्याचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वागत प्रकल्प संचालक अमोल जाधव यांनी केले. याप्रसंगी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *