सोलापूर : सर्वोच्च न्यायालय स्थापित रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे (निवृत्त न्यायमुर्ती) हे दि. 17 ते 24 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.
दि. 20 ते 22 ऑक्टोबर दरम्यान अध्यक्ष सप्रे हे सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने रस्ते सुरक्षेशी निगडीत विभागांचे अधिकारी, रस्ते सुरक्षेच्या संदर्भाने काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी तसेच धाराशिव व बीड जिल्ह्यातील रस्ता संबंधित कार्य करणारे कार्यकारी अधिकारी यांचेसोबत आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपागर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातून जाणारे महामार्ग व होणाऱ्या अपघातांविषयी या बैठकीत गंभीर चर्चा होणार आहे.
रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष सोलापूर दौऱ्यावर

More Stories
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ राज्य अतिरिक्त सरचिटणीसपदी अरुण क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी गिरीश जाधव
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते राष्ट्रपती पदक विजेते एसीपी मनोजकुमार यादव यांच्यासह मान्यवरांचा सन्मान