सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पावणे चार कोटीच्या विविध विकास कामांच्या निविदांना मंजुरी देण्यात आली.
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा विकास यंत्रणेच्या सभागृहात झाली. सभेच्या विषय पटलावर सात विषय होते. प्रारंभी 18 सप्टेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करण्यात आले. त्यानंतर बांधकाम विभाग क्रमांक एक कडील ही रस्ते केगाव रस्ता सुधारणा करणे या एक कोटी तेरा लाख 20 हजार रुपये किमतीच्या निविदेला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील नारी ते भातंबरे रस्ता, मालवडी ते कापसेवाडी, कुसळंब ते वानेवाडी, पिंपळगाव धस ते चिपडे वस्ती, आगळगाव ते थिटे वस्ती जोड रस्ता सुधारणा करण्याच्या 77 लाख 85 हजार किमतीच्या निवेदला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ ते बनजगोळ- हत्तीकणबस रस्ता सुधारणा करण्याच्या 85 लाख 1 हजार 724 रुपये किमतीच्या निवेदला मंजुरी देण्यात आली. हल्लूर येथे बहुउद्देशीय सभागृह बांधण्याच्या 90 लाख 56 हजार 601 रुपयाच्या निवेदला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील तडवळ, दहिटणे, राळेरास धामणगाव, दहीटणे, सासुरे या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या 97 लाखाच्या निवेदला मंजुरी देण्यात आली. अशाप्रकारे या सभेत तीन कोटी 73 लाख 24 हजार 167 खर्चाच्या विविध विकास कामांच्या निवेदला मंजुरी देण्यात आल्या. त्याचबरोबर अध्यक्षाच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयावर यावेळी चर्चा करण्यात आली. सभेचे सचिव तथा प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी विषयांचे वाचन केले. या सभेला सर्व विभाग व खातेप्रमुख उपस्थित होते.