झेडपीच्या साहेबांशी वाद घालणाऱ्या लिपिकाला नोटीस

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये घुसून विनाकारण एकेरीवर बोलणाऱ्या लिपिकाला कार्यकारी अभियंत्याने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये दोन दिवसांपूर्वी एका लिपिकाने प्रवेश करून कार्यकारी अभियंत्याशी वादावादी केली. संबंधित अधिकाऱ्याने करमाळा तालुक्यातील कामाविषयी बैठक घेऊन आढावा घेतला. त्यात बरीच कामे मागे असल्याचे दिसून आले. एक महिला कर्मचारी बऱ्याच दिवसापासून रजेवर असल्याचे दिसून आले. त्याबाबत अधिकाऱ्याने विचार न केल्यावर प्रसुती रजेवरती महिला कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रजेच्या अर्जाचे व इतर चौकशी केल्यावर परस्पर तीने रजा घेतल्याचे दिसून आले. पण इतरांना मात्र मिळतात अशा तक्रारी केल्या. त्या महिलेचा पती कार्यालयात काम करत असल्याने त्यांनी परस्पर रजा मंजूर करून पगार काढल्याचे दिसून आले. अशा त्या कर्मचाऱ्यांना पुन्हा रजेचा अर्ज दिला. त्यावर अधिकाऱ्याने त्याचे खरडपट्टी करून रजा मिळणार नाही अशी तंबी दिली.
रजा नाकारल्यानंतर दोन दिवसापूर्वी तो कार्यालयात आला व त्यांने अधिकाऱ्यांशी एकेरीवर वाद घातला. कार्यालयात उपस्थित असलेल्यांनी ही वादावादी सोडवली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी त्याला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगण्यात आले.