सोलापूर : अक्कलकोट पंचायत समितीअंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या परिचारिका के. सी. धोत्रे यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शन पेपरचा लाभ मंजूर करून चांगल्या उपक्रमाची सुरुवात केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
परिचारिका धोत्रे या जानेवारीअखेर निवृत्त झाल्या. निवृत्तीच्या दिवशी त्यांना पेन्शन व इतर लाभ देण्यासाठी अक्कलकोट पंचायत समितीचे आस्थापना लिपिक विकास गुळमिरे, जिल्हा परिषद मुख्यालयातील लिपिक प्रदीप सकट यांनी विशेष प्रयत्न करून सेवानिवृत्तीच्या दिनांक पेन्शन पेपरचा लाभ मंजूर करून दिलेला आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पथकाचे कौतुक केले व यापुढे असेच निवृत्ती दिवशी कर्मचाऱ्यांना लाभ देण्याची यंत्रणा राबविण्यात येईल असे सांगितले. तसेच परिचारिका धोत्रे परिचारिका यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष गिरीश जाधव, लघु पाटबंधारे विभागाचे उप अभियंता एस. एस. उंबरजे, शाखा अभियंता धनंजय राठोड, ए जे मुजावर उपस्थित होते.