सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर झेडपीच्या क्रीडा स्पर्धा “या’ तारखेला होणार

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा ६ व ७ फेब्रुवारी रोजी होणार आहेत. नेहरूनगर येथील शासकीय मैदान, जय जवान शाळेचे मैदान आणि ऑफिसर्स क्लब येथे क्रीडा स्पर्धा तर 8 फेब्रुवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अध्यक्षतेखाली जि.प. क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीची सहविचार सभा घेण्यात आली. या सहविचार सभेसाठी जि.प. क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे सहप्रमुख तथा अतिरिक्तत मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, एस.बी. ठोंबरे, विशेष निमंत्रीत सदस्य नरेंद्र पवार, सचिव स्मिता पाटील, सहसचिव अनिल जगताप, संजय सांवत, सदस्य मिनाक्षी वाकडे., इशाधिन शेळकंदे, अमोल जाधय, एस. व्ही. कुलकर्णी, कादर शेख, संतोष नवले, प्रसाद मिरकले,सांस्कृतिक विशेष निमंत्रीत सदस्य सिमा यलगुलवार, सुमित फुलमामडी, प्रशांत बडवे, गोवर्धन कमटम,किरण लोंढे, क्रीडा विशेष निमंत्रीत सदस्य रविंद्र चव्हाण,. गणेश पवार,. संतोष जाधव, सचिन जाधव, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, गिरीष जाधव यांची प्रमुख उपस्थित होती.

जिल्हा परिषदेमधील पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडूवृती, परस्पर समन्वय, सहनशीलता, ताणतणावाचे व्यवस्थापन इत्यादी मूल्ये वाढीस लावून निखळ मनोरंजनातून आनंद घेणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू असून या स्पर्धेतून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील प्रशासकीय कामाचा थकवा घालवून व परस्पर सद्भावना वाढीस लागून नव्या जोमाने जि प प्रशासनाच्या सर्व योजना लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठीच्या कार्यास नव्या उत्साहाने कार्यास लागता यावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य् कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असल्याचे उप मुंख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगितले.

या क्रीडा स्पर्धेत सांधिक क्रिकेट, खो-खो, कबड्डी, डायरेक्ट हॉलीबॉल, भो बॉल, मैदानी स्पर्धेत १०० मी, २०० मी, ४०० मीटर धावणे, ४ गुणिले १०० मी. रिले महिला, पुरुष व मिश्र (महिला व पुरुष), ३००० मी. व ५००० मी. चालणे, लांब उडी, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक तसेच इनडोअर गेममधे बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ व टेबल टेनिस हे क्रीडा प्रकार तर मनोरंजनात्मक खेळ लिंबू चमचा व संगीत खुर्ची याही खेळ बाबीचा समावेश करण्यात आला आहे, त्याचबरोबर याच वर्षी विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धेत, वैयक्तिक महिला/पुरुष, पारंपारिक गीतगायन महिला/पुरुष, वैयक्तिक गीत गायन (हिंदी मराठी चित्रपट गीत) महिला/पुरुष, गीत-गायन व्दंव्दगीत (Duet) महिला/पुरुष, वैयक्तिक नृत्य महिला/पुरुष, (पारंपारिक नृत्य प्रकार), वैयक्तिक नृत्य महिला/पुरुष, (हिंदी – मराठी चित्रपट गीतावर नृत्य), समूहगीत, प. लोकनृत्य प्रादेशिक वैशिष्टे, संस्कृती, भारतीय परंपरा, महाराष्ट्रीयन नृत्य प्रकार असावा. (गाणे टेप रेकॉर्डवर सादर करण्यास परवानगी आहे.) महिला, पुरुष व मिश्र (महिला व पुरुष), सह नृत्य मराठी व हिंदी चित्रपटातील गीतावर आधारित असाये महिला, पुरुष व मिश्र (महिला व पुरुष), समुहगीत पर्यावरण गीत, देशभक्ती गीत, ग्राम स्वच्छतेवर आधारीत गीत, भावगीत व चित्रपटातील गीत या पैकी कोशत्याही एकाच गीताची निवड करावी महिला, पुरुष व मिश्र (महिला व पुरुष), समुहगीत मराठी प हिंदी चित्रपटातील गीतावर आधारित असावे महिला, पुरुष व मिश्र (महिला व पुरुष). या स्पर्धा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे.

या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत ग्रामपंचायत स्तरापर्यंतचे  पदाधिकारी व जिल्हा परिषदेतील सर्व विभागातील अधिकारी प कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन जि.म. क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे प्रमुख तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले आहे.या स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी वीस पेक्षा जास्त वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात येणार असून दरवर्षी या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेला भरभरून सर्वांचा उत्स्फूर्तपणे सहभाग असतो. या स्पर्धेची पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत असतात, याही वर्षी सर्व विभागातील मुख्यालय व सर्व तालुक्यातून दोन हजार पेक्षा जास्त खेळाडू व कलावंत या स्पर्धेत सहभागी होणार असून याला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे.या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन)  स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समित्यांचे प्रमुख, सचिव व सदस्य तसेच क्रीडा व नियोजन समिती चे सहसचिव. अनिल जगताप, सहसचिव संजय सावंत, सचिन जाधव, किरण लोंढे,सदस्य विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, झहीर शेख, नागेश पाटील, सचिन साळुंखे, नागेश धोत्रे, गिरीष जाधव, गणेश कुडले पुंडलिक कलखांबकर, शिवाजी वसपटे, शहानवाज मुल्ला, मल्लिकार्जुन सोमेश्वर, डॉ. माधुरी भोसले, नरेंद्र अकेले, इरफान कारंजे व कृष्णकांत लोवे इत्यादी काम पाहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button