कलेक्टर आशीर्वाद, शिक्षणाधिकारी जगताप यांच्या “या’ कामाचं होतंय कौतुक

सोलापूर : बारावी परीक्षेच्यावेळी सोलापूर जिल्ह्यात कलेक्टर कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाचा माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मणराव ढोबळे यांनी कौतुक केलं आहे.
सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना एक पत्र दिलं आहे. या पत्राद्वारे ढोबळे यांनी बारावी परीक्षेच्या वेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी राबवलेल्या कॉपीमुक्त अभियानाच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोठा पोलीस बंदोबस्त व प्रशासकीय यंत्रणा मदतीला दिल्याने हे अभियान यशस्वी होण्यासाठी मोठा हातभार लागल्याचे ढोबळे यांनी म्हटले आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे बुद्धिमानांना चालना देण्याचे काम झाले आहे. तसेच या अभियानाचा श्रीमंत व पुढार्यांच्या मुलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात विधानसभेत जिल्हाधिकारी आशीर्वाद व माध्यमिक शिक्षणाधिकारी जगताप यांच्या विरोधात तारांकित प्रश्नाद्वारे लक्षवेधी केली जाऊ शकते. अशावेळी आम्ही या दोघांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचे ढोबळे यांनी म्हटले आहे. जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनाला कडक निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक परीक्षा केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी जगताप यांनी पुढे पाऊल टाकत चक्क परीक्षा कक्षच ऑनलाईन केला आहे. त्यामुळे कॉपीमुक्त अभियान 100% यशस्वी झाले आहे. मी स्वतः अनेक परीक्षा केंद्रावर फेरफटका मारला आहे. प्रशासनाने राबवलेल्या या उपक्रमाची जनसामान्यात चांगली चर्चा सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात शिक्षण क्षेत्रात पहिल्यांदा असं चांगलं घडलं आहे. त्यामुळे कलेक्टर आशीर्वाद व शिक्षणाधिकारी जगताप हे दोघेही कौतुकास पात्र आहेत असं ढोबळे यांनी नमूद केला आहे. त्यामुळे या दोघांच्या कौतुकाचा झेंडा राज्यभर फडकला गेला आहे.
वाचा ढोबळे यांचे पत्र…