विवेक लिंगराज यांचे काम कायम स्मरणात राहील ; शोकसभेत अनेकांनी केल्या भावना व्यक्त

सोलापूर : विवेक लिंगराज निःस्वार्थी व्यक्तिमत्व होते. त्यांची कल्पकतेची जिल्हा परिषदेत मदत झाली. जिल्हा परिषदेमध्ये काम करीत असताना विवेक लिंगराज यांनी निःस्वार्थी भावनेने काम केले, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी व्यक्त केले
सोलापूर जिल्हा परिषद आवारात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस विवेकानंद लिंगराज यांचे अपघाती निधन झाल्याने मंगळवारी अधिकारी, पदाधिकारी व कर्मचारी व पत्रकार यांच्यावतीने शोकसभा घेण्यात आली.
प्रारंभी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी कै. विवेकानंद लिंगराज यांच्या प्रतिमेस फुले वाहून अभिवादन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संतोष नवले, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, लिंगराज परिवारातील मुलगा अवनीश, मुलगी ओवी, लिंगराज यांच्या भगिनी गीताताई, भावजय शुभांगी लिंगराज यांचे सह, कर्मचारी संघटनेचे पंडित भोसले, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कामगार नेते अशोक इंदापुरे , महसुल कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक शंतनू गायकवाड, महासंघाचे राजेश देशपांडे, श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, जिल्हा परिषद बीट पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे यांनी श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले.
मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, आरोग्य कर्मचारी संघटनेचे महेश जाधव, पतसंस्था २ चे गिरीश जाधव, कास्ट्राईब संघटनेचे अरुण भाऊ क्षीरसागर, दिनेश बनसोडे , शिवानंद भरले, विरभद्र यादवाड, जिल्हा परिषद पतसंस्थेचे चेअरमन डाॅ. एच पी माने, व्हा. चेअरमन सुरेश कुंभार, दयानंद परिचारक, मुत्तुवल्ली, चेतन वाघमारे,, पत्रकार यांचे सह सर्व संचालक मंडळ, महिला व पुरूष कर्मचारी शोकसभेस उपस्थित होते. प्रास्तविक चेअरमन डाॅ. एच. पी. माने यांनी केले. सुत्रसंचालन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले. आभार नितीन शिंदे यांनी मानले. जिल्हा परिषदे मध्ये काम करीत असताना विवेक लिंगराज यांनी निःस्वार्थी भावनेने काम केले. सहा महिनेचे कालावधीत त्यांची कामाची चिकाटी, दिलेल्या जबाबदारी परिपूर्ण अंमलबजावणी ते करीत. अभिलेख वर्गीकरणाचे काम देखील त्यांनी कटाक्षाने केले. सर्व कर्मचारी यांचे वतीने ते बोलत असत. त्यांचे मध्ये खुप विनम्रता होती. असेही सिईओ कुलदीप जंगम यांनी बोलताना सांगितले.
लिंगराज यांचे कार्य स्मरणात राहिल
विवेक लिंगराज यांचे जिल्हा परिषदे प्रशासनात मोठे योगदान आहे. कृषी विभागात काम करीत असताना एखादा मुद्दा ते पटवून सांगायचे. डीबीटी योजनेत त्यांनी क्युआरकोड ही संकल्पना राबवून सर्व योजना एकत्रित आणण्याचे काम केले असून विवेक लिंगराज यांचे कार्य स्मरणात राहिल असे अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी सांगितले.
सिईओ जंगम यांनी केले लिंगराज परिवाराचे सांत्वन
शोकसभे साठी आलेले लिंगराज यांचा मुलगा, मुलगी, बहिण व भावजय यांना स्वतः चे सिईओ दालनात बोलावून त्यांना चहापान करून आदरपूर्वक सन्मान करून त्यांचे कुटूंबियांना आधार देणेचे काम सिईओ कुलदीप जंगम यांनी केले. त्यांनतर अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी व्यक्तिशः लिंगराज यांचे कुटूंबियांना बोलून धीर दिला. सामान्य प्रशासन विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी कुटूंबियांना दालनात बोलावून त्यांची संबंधित कागदपत्रे व विमा व इतर बाबींचा पुर्तता वेळेत करणेची ग्वाही दिली.
असा अधिकारी होणे नाही
जिल्हा परिषदेत काम करीत असताना विवेक लिंगराज यांनी प्रामाणिकपणे काम केल. असा प्रामाणिक अधिकारी पाहिला नाही. गेल्या ३६ वर्षा पासून त्यांचे मैत्रीचे संबंध राहिले असल्याचे पंतसंस्थेचे मार्गदर्शक व माजी कार्यकारी अभियंता पंडित भोसले यांनी सांगितले.
अनेकांना भावना अनावर
जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, माजी कार्यकारी अभियंता पंडित भोसले, महिला कर्मचारी जोत्सनी साठे यांनी मनोगत व्यक्त करताना रडू कोसळले…भावना अनावर झाल्या. लिंगराज कुटुंबीयांच्या डोळे अश्रुने भरले होते.
विवेक उद्यान नाव द्या
जिल्हा परिषदेचे आवारात जी वृक्ष लागवड झाली आहे त्यामध्ये विवेक लिंगराज यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे हिरवळ निर्माण झाली आहे. त्यामुळे या बागेला विवेक उद्यान असे नाव देण्याची मागणी ऍड. राजेश देशपांडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, पत्रकार शेखर गोतसुर्वे यांनी केली.