संभाजी ब्रिगेडच्या बारलोणी गटप्रमुखपदी संदेश बागल यांची निवड

सोलापूर : संभाजी ब्रिगेडच्या बारलोणी गटप्रमुखपदी बारलोणी (ता.माढा) येथील संदेश हरिदास बागल यांची निवड करण्यात आली.
टेंभुर्णी येथे मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड प्रणित मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने ‘छत्रपती शिवरायांचे स्वराज्य अन् आजचे राज्यकर्ते’ या विषयावर संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक डॉ.बालाजी जाधव यांचे व्याख्यान शनिवारी सायंकाळी पार पडले. यावेळी डॉ. बालाजी जाधव यांच्याहस्ते निवडीचे पत्र देऊन संदेश बागल यांचा सत्कार करण्यात आला. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, जिल्हा सचिव सुहास टोणपे,मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटिल, मराठा सेवा संघाचे माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष अविनाश पाटील, मराठा सेवा संघाचे उपाध्यक्ष मेजर अरूण जगताप, टेंभुर्णी शहराध्यक्ष पपेश पाटील, तुकाराम भोसले, अल्ताफ शेख यांच्या हस्ते संदेश बागल यांचा पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना संदेश बागल यांनी, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडच्या विचारांना अनुसरून कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.