सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी रमले सेंद्रिय शेती कार्यशाळेत

सोलापूर : जिल्हात सेंद्रीय शेतीची चळवळ सुरू होत आहे. सिध्देवाडी सेंद्रिय शेतीचे रोल माॅडेल करा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले.
पंढरपूर तालुक्यातील सिध्देवाडी येथे सोमवारी जिल्हास्तरीय सेंद्रीय शेती कार्यशाळेत युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पोलिस उप अधिक्षक अर्जून भोसले, तालुका पोलिस निरीक्षक तय्यब मुजावर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सरपंच रोहिणी जाधव, पोलिस हवालदार दत्तात्रय जाधव, उपसरपंच आनंदा जाधव, दीपक भालेकर, तंटामुक्तीचे अध्यक्ष समाधान जाधव, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी चौधरी, कार्यक्रम अधिकारी केंद्रे प्रमुख उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग, कर्मवारी भाऊराव पाटील महाविद्यालय आणि ग्रामपंचायत सिध्दवाडी, कै. स्वाती जाधव महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सिध्देवाडी गावात “शेतकऱ्यांनी दोन गुंठे स्वतसाठी’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. यासाठी सर्व तांत्रिक सहाय्य करण्यास टीम तयार आहे. घरगुतीस्तरावर परसबागांचे नियोजन करा. स्वतःच्या घरासाठी भाजीपाला निर्माण करा. सध्या युवकांच्या माध्यमातून अन्न सुरक्षा व विषमुक्त शेतीचे प्रयोग सुरू करा. यामध्ये महिलांचा सहभाग महत्वाचा असल्याचे पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी सांगितले.
नदीकाठाची जमिनीची धुप थांबविण्यासाठी बांबू लागवड व वृक्षारोपण करा. नदीकाठी स्वच्छता मोहिम राबवा. पर्यावरण चांगले राहण्यासाठी देशी वृक्ष लावा. रोजगार हमी योजना व वनीकरण विभाग, ग्रामपंचायत यांनी एकत्रित कृती संगम करावे. या मोहिमेतसाठी मी स्वतः येण्यास तयार आहे असे पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
माणच्या तीरावर सोमलिंग मंदिर परिसरात पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचेहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांनी माण नदी काठाची फिरून पाहणी केली.
महिलांच्या सुरक्षितते साठी ऍप तयार करत आहोत. मुलींनो निर्भयपणे शिक्षण घ्या. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन कटीबध्द आहे, असेही पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. स्वागत रमांकात गायकवाड यांनी केले. याप्रसंगी महिला बचतगटाचे सदस्य, मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविका यांना देशी भाजीपाला, बियाणाचे वाटप पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचेहस्ते करण्यात आले. प्रास्तविक जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी केले.प्रास्तविक भाषणात रासायनिक खतामुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी व विषमुक्त शेतीसाठी पोलिस अधिक्षक कुलकर्णी यांनी धाराशिव मध्ये राबविलेले सेंद्रीय शेतीचे उपक्रम सिध्देवाडी गावात राबवित आहोत. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ राष्ट्रीयसेवा योजना विभाग यांचे सहकार्य घेत असल्याचे सचिन जाधव यांनी सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य संगिता सुरेश गोडसे, बेबीनंदा बाबुराव गोडसे, आप्पा जाधव, रमेश बनसोडे, विजय जाधव, भास्कर जाधव, सरपंच रोहिणी सारंग जाधव, गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर सारंग जाधव, ग्रामसेवक महादेव भुसे, दैवशीला घुले, पोलीस पाटील चिचुंबे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश्वर जाधव, सुरेश गोडसे, रमेश बनसोडे, ज्ञानेश्वर यशवंत गडदे, बालाजी जाधव, किरण जाधव, चंद्र दिपक भालेकर गुरुजी, एम. बी. जाधव गुरुजी, पांडुरंग जाधव, समाधान जाधव (तंटामुक्त अध्यक्ष), बजरंग जाधव यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन रमांकात गायकवाड यांनी आभार एम. बी. जाधव यांनी मानले.