सोलापूरचा भुईकोट किल्ला, सिद्धेश्वर मंदिर परिसराचे सौंदर्य पाहून ग्रामविकास मंत्री गोरे आवक
आमदार देवेंद्र कोठे, पंचकमिटीच्या विश्वस्तांकडून जाणून घेतली माहिती

सोलापूर : राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गुरुवारी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याकडून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मंदिराविषयी विस्तृत माहिती जाणून घेतली.
प्रारंभी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते श्री सिद्धरामेश्वरांची आरती करण्यात आली. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीकडून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गोरे यांनी मंदिराची तसेच मंदिर परिसरात सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. याप्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांचा इतिहास, पंच कमिटीच्या आजवरच्या धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची माहिती दिली.
पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर, मंदिराभोवतालचा तलाव, भुईकोट किल्ला यामुळे हा परिसर निसर्गरम्य आणि अतिशय सुंदर भासतो. श्री सिद्धरामेश्वर मंदिरासाठी शासनाकडून जी सेवा देता येईल ती करण्यासाठी तत्पर राहणार आहे.
यावेळी आमदार देवेंद्र कोठे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगांवकर, मेघनाथ येमुल, राजकुमार हंचाटे, सुरेश तमशेट्टी, संतोष पाटील, भाजपा सरचिटणीस नागेश सरगम, भाजपा युवा मोर्चाचे अक्षय अंजिखाने, भाजपा ओबीसी सेलचे सिध्दाराम खजुरगी, सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे गुरु माळगे, प्रभूराज मैंदर्गीकर, रतन रिक्के, ॲड. आर. एस. पाटील, परिवहनचे माजी सभापती आनंद मुस्तारे, विजय कुलथे, भाजपा सोशल मीडियाचे अभिषेक चिंता, अंबादास सकिनाल, संकेत विभुते, कुमार पायाणी उपस्थित होते.