सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

महिला शाळेवर अतिरिक्त पुरुष शिक्षक घेण्याचा शिक्षणाधिकारी जगताप यांचा दबाव

जगताप यांच्या धमकीला शाळेने दिले खुले आव्हान

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांचा आणखी एक प्रताप चव्हाट्यावर आला आहे. अतिरिक्त झालेला मर्जीतील शिक्षक महिला शाळेवर घेण्यासाठी त्यांनी टाकलेला दबाव संस्थेने झुगारला आहे. त्यामुळे शिक्षकांचा पगार बंद करण्याच्या त्यांच्या धमकीलाही “त्या’ संस्थेने खुले आव्हान दिले आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे विविध कारणांमुळे सध्या चर्चेत आले आहेत. न्यायालयाकडून आलेल्या प्रकरणावरून त्यांनी थेट केलेली टिप्पणी अडचणीची ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या कामाबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे गेलेले तक्रारीवरून कारवाई होऊ नये म्हणून आपण कर्तव्यदक्ष असल्याचा आव्हानात विविध व्यक्तींकडून सत्कार करून घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. अशात एका संस्थेने जगताप यांच्या कार्याचा धक्कादायक दाखला पुढे केलेला आहे. माध्यमिक शाळांमध्ये अतिरेक ठरलेले अनेक शिक्षक सध्या प्रतिनियुक्तीच्या प्रतीक्षेत माध्यमिक शिक्षण विभागाकडे हेलपाटे घालत आहेत. यातीलच शिक्षणाधिकाऱ्यांच्या जवळ गेलेल्या नवले नामक शिक्षकाच्या नियुक्तीसाठी  शिक्षणाधिकारी जगताप यांनी सोलापुरातील एका नामांकित मुलींच्या शाळेत पाठवले. माध्यमिक शिक्षण विभागाने यापूर्वी या संस्थेत चार अतिरिक्त शिक्षकांना पाठवले होते. मुलींच्या शाळेत फक्त महिला शिक्षक असल्यामुळे संबंधित संस्थेने पुरुष शिक्षक रुजू करून घेण्यास नकार दिला. त्यावर शिक्षणाधिकारी जगताप यांनी त्या शिक्षकाला रुजू करून घ्यावे अन्यथा पगार बंद करण्याची धमकी दिली. पण शिक्षण अधिकारी जगताप यांच्या धमकीला संबंधित संस्था घाबरली नाही. त्यावर संतापलेल्या जगताप यांनी शाळेची मान्यता काढून घेण्याची दुसरी धमकी दिली. पण ती नामांकित संस्था असल्याने त्यांनी याही धमकीला भीक घातली नाही. त्यामुळे लाडक्या शिक्षकाची प्रतिनियुक्ती हा विषय गंभीर बनला आहे. शिक्षणाधिकारी जगताप यांना इतर शिक्षकांचे काही देणे घेणे दिसत नाही. माध्यमिक शाळांवर अतिरिक्त ठरलेले अनेक शिक्षक बसून पगार घेत आहेत. पण अशा शाळांचा शोध घेऊन त्या शिक्षकांना नियुक्ती देण्यात माध्यमिक शिक्षण विभागाला अपयश आल्याचे दिसत आहे. पण ठराविक शिक्षकांना प्रतिनियुक्ती देण्यासाठी ते कोणत्याही थराला जात असल्याचे दिसून येत आहे. या सर्व तक्रारी शिक्षणमंत्र्यापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत.

धाराशिवचे प्रताप सोशल मीडियावर 

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची सोलापुरातील कारकीर्द माध्यमातून झळकू लागल्यावर यापूर्वी त्यांनी धाराशिवला केलेला प्रताप सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. त्यामुळे आता “असला शिक्षणाधिकारी नको ग बाई..!” अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button