समाजकल्याण विभाग करणार संविधान जनजागृती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह

सोलापूर : महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा समजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे यांनी दिली.
शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उददेशाने दरवर्षी समता सप्ताहाचे आयोजन करणेत येते. या निमित्ताने जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयात या उपक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विस्तार अधिकारी एम. जी. म्हेत्रे, अधिक्षक सचिन सोनकांबळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, राजश्री कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
यानिमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित कार्यक्रमात भारतीय संविधानाची उददेशिका / प्रस्ताविका यांचे वाचन भारतीय जनतेत संविधानाविषयी जनजागृती निर्माण करणेत येणार आहे, असे समाज कल्याण अधिकारी सोनवणे यांनी सांगितले.समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, सर्व पंचायत समिती तसेच सर्व ग्रामपंचायती व शासकीय कार्यालये, शाळा, अनु. वसतीगृह दिव्यांग या ठिकाणी हे कार्यक्रम होणार आहेत.
दि. 9 एप्रिल रोजी जिल्हयातील सर्व शाळा (दिव्यांग शाळासहीत) महाविदयालये शासकीय वसतीगृह येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा/निबंध स्पर्धा/लघुनाटय स्पर्धा इ कार्यक्रमाचे आयोजन करणे. यामध्ये समाजकल्याण विभागाकडील विविध योजनांचा लाभप्रातिनिधीक स्वरुपात लाभार्थ्यांना वाटप करणे.जिल्हयातील सर्व (दिव्यांग शाळा शाळासहीत) महाविदयालये शासकीय वसतीगृहात हे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
10 एप्रिल रोजी तालुक्यामध्ये मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी शाळा व महाविदयालये यांचेमार्फत पथनाट्य व लघुनाटिका याव्दारे सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांबाबत जनतेचे प्रबोधन करण्यात येणार आहे.सर्व पंचायत समिती तसेच सर्व ग्रामपंचायती, शाळा, अनु. वसतीगृह या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत. 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे तसेच म. फुले यांच्या सामाजिक कार्याविषयी वक्ता बोलवून कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आंतरजातीय जोडप्यांचा सत्कार तसेच सलग 18 तास अभ्यास करणे उपक्रमाचे आयोजन केले आहे.
12 एप्रिल रोजी संविधान जागर-भारतीय संविधानाविषयी सर्वसाधारण माहिती देणे जसे की, संविधानाची निर्मिती, संविधान निर्मिती समिती, अनुच्छेद विशेषतः मुलभुत अधिकार व मुलभूत कर्तव्ये याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे कार्यक्रम पंचायत समिती सर्व ग्रामपंचायती सर्व, दिव्यांग शाळा, अनु. वसतीगृह येथे होणार आहेत.13 एप्रिल रोजी जिल्हा परिषद अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती शिबीर, मेळावा आयोजित करणे तसेच शाळा व महाविदयालये शासकीय वसतीगृहे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तालुक्याच्या सर्व ग्रामपंचायतीमधील अनु.जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीमध्ये स्वच्छता अभियानरा बविणेत येणार आहेत. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व्याख्यान, भिमगीत गायनाचा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास जिल्हयातील विविध लोकप्रतिनिधींना निमंत्रित केलेले आहे. पंचायत समिती सर्व, ग्रा.पं.सर्व व यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद सोलापूर येथे हे कार्यक्रम होणार आहेत. असेही समाज कल्याण अधिकारी सोनवणे यांनी सांगितले.