सोलापूरजिल्हा परिषदशिक्षण

सोलापूरचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांना कोर्टाचा 15 हजाराचा दंड

अवमान याचिकेत उच्च न्यायालयाची सपशेल मागितली माफी

सोलापूर : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे योग्य पालन न करता मनमानी पद्धतीने कारभार केल्यामुळे शिक्षणाधिकारी कादर शेख आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडारकवठे येथील  श्री सोमलिंग शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष यांना मुंबई उच्च न्यायालयाने प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दि. 19 जुलै 2024 रोजी प्रक्रिया योग्य प्रकारे न राबवता दिलेले आदेश रद्द केले आहेत.

या प्रकरणाची वस्तुस्थिती अशी की, यातील फिर्यादी युनूस मुबारक शेख यांची श्री सोमलिंग शिक्षण प्रसारक व क्रीडा मंडळ संचलित श्री महासिद्ध प्राथमिक शाळा भंडारकवठे येथे सन 2012 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर सन 2020 मध्ये संस्था अध्यक्षांनी आपल्या भावाच्या सुनेला अनुदानित पदावर नियुक्ती मिळवण्यासाठी युनूस शेख यांना विनाअनुदानित पदावर बदलीचा प्रस्ताव ठेवला. त्याला फिर्यादी यांनी ॲड.श्री अशोक ताजणे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका  दाखल केली. त्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्या. नितीन जामदार आणि न्या.एम. एम. साठे यांच्या पीठाने शाळा व संस्थेची सर्व कागदपत्रे तसेच रेकॉर्ड तपासणी करून नियमानुसार निर्णय घ्यावा असे दिनांक 12 जून 2024 रोजी आदेश दिले होते.

परंतु शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी उच्च न्यायालयाचे आदेश डावलून कोणत्याही कागदपत्रांची पडताळणी न करता एकतर्फी निर्णय दिला. ही बाब ॲड.नरेंद्र बांदिवडेकर आणि ॲड. अशोक ताजणे यांनी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. या प्रकारामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला आहे. त्यामुळे आपल्याविरुद्ध आवमानाची कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा उच्च न्यायालयाने केल्यानंतर शिक्षणाधिकारी आणि संस्था अध्यक्षांच्या वकिलांनी न्यायमूर्तींची माफी मागून अवमाननाची कारवाई करू नये, अशी विनंती केली. त्यावर न्यायमूर्तींनी दया दाखवत शिक्षणाधिकारी कादर शेख आणि संस्थाचालक यांनी प्रत्येकी 15 हजार रुपये दंड चिल्ड्रन एड सोसायटी मुंबई आणि इन डिफेन्स ऑफ एनिमल्स या संस्थेस अदा करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात फिर्यादीतर्फे  ॲड.अशोक ताजणे,ॲड.नरेंद्र बांदीवाडेकर,ॲड.योगेश थोरात यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button