सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत पाच वर्षाहून अधिक काळ एकाच टेबलाला चिटकून बसलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या 30 व 31 मे रोजी होणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार प्रशासन विभागाने बदल्याचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेत बदल्यांचा अंतिम टप्पा आता सुरू होत आहे. आरोग्य व ग्रामपंचायत आणि पंचायत समित्या कडील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. विनंती व प्रशासकीय बदल्यानंतर पाच वर्षाहून अधिक काळ एकाच ठिकाणी असलेल्यानाही आता बदलले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांमुळे अनेकांना पंचायत समितीकडून मुख्यालयात येता येत नाही. आरोग्य विभाग बदल्या करताना मुख्यालयाबरोबरच दक्षिण व उत्तर सोलापूर पंचायत समिती मधील रिक्त जागा दाखवत नाही अशा कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे इतर तालुक्यात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयाबरोबरच या दोन तालुक्यात संधी मिळत नाही. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पाच वर्षाहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांना बदलण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता शहरातही संधी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. बऱ्याच ग्रामपंचायतीकडे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी नाहीत त्यामुळे एकाच ग्रामसेवकाला पदभार सांभाळावा लागत आहे त्यामुळे मोठ्या ग्रामपंचायतींना ग्रामसेवक मिळणार आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली बदल्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत समुपदेशनाद्वारे कर्मचाऱ्यांना नव्या पोस्टिंग मिळणार आहेत.
सीईओच्या पीएला कार्यमुक्त करा…
मुख्य कार्यकारी कुलदीप जंगम यांनी एकाच जागी पाच वर्षे कालावधी पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले असले तरी यापूर्वी अक्कलकोट येथे बदली झालेल्या सीईओचे पीए सुधाकर माने- देशमुख यांना कार्यमुक्त करावे अशी मागणी होत आहे. सीईओनी पीएपासून या धोरणाची अंमलबजावणी केल्यास इतर कर्मचाऱ्यांनाही न्याय मिळेल, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमधून सुरू आहे.
प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी जाहीर केलेले नवे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.


साहेब आपल्या बातमीमुळे खूप चांगल्या प्रकारची माहिती मिळते…
अनुकंपाकधारकांचा विषयी खूप दिवसांपासून पेंडिंग राहिला आहे तरी आपण आपल्या स्तरावरून तो विषय मार्गी लावावा. ही नम्र विनंती…