सोलापूर : जिल्हा परिषद सेस फंड योजनेंतर्गत कृषी विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषद सेस फंडातून शेतकऱ्यांना पीक संरक्षण उपकरणे, ट्रॅक्टरचलित अवजारे व कृषी सिंचनासाठी अवजार साधने 50 टक्के अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील इच्छुक शेतक-यांनी दिनांक 20 जूनपर्यंत पंचायत समिती कार्यालयाकडे परिपुर्ण कागदापत्रासह अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी केले आहे.
जिल्हा परिषद सेस फंडातुन कृषि विभागाकडून पिक संरक्षण औजारे/उपकरणे (श्री पिस्टन स्प्रे पंप, पॉवर स्प्रेपंप, नॅपसॅक बॅटरी ऑपरेटेड स्प्रेपंप, ब्रश कटर, सोलार इन्सॅक्ट ट्रॅप), ट्रॅक्टर चलित औजारे (रोटाव्हेटर, पल्टी नांगर, रोटरी टिलर/विडर, पेरणी यंत्र), कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने (५एच पी सबमर्सिबल विदयुत पंपसंच, डिझेल इंजिन) कृषि सिंचनासाठी सुधारित औजारे साधने (कडबाकुटटी, ताडपत्री, मधुमक्षीका पेटी, स्लरी फिल्टर) सेंद्रीय शेती (हिरवळीचे खतबियाणे, ताग, धेंचा, गांडूळ, कल्चर व बेड) 50 टक्के मर्यादित अनुदानावर डीबीटी तत्त्वावर देण्यात येणार आहेत. सदर योजनेमध्ये अनु-जाती, अनु-जमाती, अत्यल्पभुधारक, दिव्यांग व महिला यांना प्राधान्य राहिल.
इच्छुक शेतक-यांनी स्वतःचा 7/12.8अ, आधार कार्ड, बैंक पासबुकच्या पहिल्या पानाचे झेरॉक्स, लाभार्थी अनु-जाती, अनु-जमातीचे असल्यास जातीचे प्रमाणपत्र व अपंग लाभार्थीसाठी अपंगत्वाच्या दाखल्याच्या झेरॉक्स प्रतिसह आपल्या पंचायत समितीकडे अर्ज करावेत. लाभाथ्यांची निवड केल्यानंतर शेतक-यांनी एक महिन्याच्या आत खुल्या बाजारातुन अधिकृत विक्रेत्याकडून आपल्या पसंतीच्या औजाराची खरेदी करावी लागेल. सदर खरेदी करावयाचे औजारे अधिकृत सक्षम तपासणी संस्थानी परिक्षण करुन ते B.I.S अथवा अन्य संस्थानी निश्चित केलेल्या प्रमाणकानुसार/तांत्रिक निकषानुसार असावेत. पावती व अवजारे फोटो अर्ज ग्राह्य झाल्यानंतर डीबीटीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
काय म्हणता… सोलापुरात ग्रामीण पोलीस भरवणार आठवडी बाजार