सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर जिल्हा परिषदेत 124 जणांची अनुकंपा भरती

सोलापूर: अनुकंपा भरती प्रक्रियेत सोलापूर जिल्हा परिषदेने पारदर्शक पाऊल टाकत 124 पदांची यशस्वी समुपदेशनाद्वारे भरती केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण पॅटर्नची चर्चा सर्वत्र होत आहे.

अनुकंपा तत्वावर भरती ही एक संवेदनशील प्रक्रिया असून, तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आणि न्यायाचा तत्वधार असणे आवश्यक असते. याच अनुषंगाने जिल्हा परिषदेने संपूर्ण प्रक्रिया राबवली. यात वर्तमानपत्र जाहिरात देणे, अर्ज छाननी, सूची प्रसिद्धी आणि प्रत्यक्ष समुपदेशन अशा टप्प्यांमधून ही भरती पार पाडली. यामध्ये कोणतीही अस्पष्टता न ठेवता, अर्जदारांना संधी आणि माहिती दोन्ही समप्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली.

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांचे यामध्ये विशेष योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि वेळेवर पार पडली.या भरती प्रक्रियेमुळे 124 अनुकंपा तत्वाखाली पात्र उमेद्वारांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून, जिल्हा परिषदेची लोकाभिमुख आणि संवेदनशील प्रशासनाची प्रतिमा अधिक दृढ झाली आहे.या कार्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे.
या अनुकंपा भरती प्रकियेसाठी प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे,सचिन साळुंखे, प्रदीप सगट, महेश केंद्रे, शिवाजी राठोड, सचिन मायनाळ,अरविंद सोनवणे, मोहित वाघमारे, संतोष शिंदे, तुषार इटकर, किरण जाधव, ऋषिकेश जाधव, इराण्णा भरडे, हनुमंत गायकवाड, कृष्णा आधटराव, रोहीत शिंदे, गणेश वटवटे,आदम नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button