सोलापूरजिल्हा परिषद

मुख्यमंत्री संकल्पनेचा सोलापुरात धडाका; झेडपीत आज 50 जणांना मिळणार नोकरी

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलेल्या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमाचा सोलापूर जिल्हा परिषदेने राज्यात पहिला मुहर्त लावला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अनुकंपा यादीवरील सेवा जेष्ठतेप्रमाणे 50 ते 100 जणांना झेडपीच्या सेवेत कायमस्वरूपाची नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या कार्यक्रमानंतर आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महसूल, जिल्हा परिषद, महापालिका, पोलीस खात्यांला विविध योजना राबविण्याचे टार्गेट दिले आहे. अनुकंपा भरती हा त्यातीलच एक मोठा कार्यक्रम आहे. अनुकंपा भरतीचा शुभारंभ राज्यात पहिल्यांदा सोलापूर झेडपीने केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आषाढी यात्रा यशस्वी केल्यानंतर अनुकंपा भरतीचे मोहीम हाती घेतली आहे. सेवा जेष्ठता प्रमाणे फायली तपासून त्यांनी यादी जाहीर केली. आता या यादीप्रमाणे जिल्हा परिषदेच्या सभागृहावर अनुकंपा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. रिक्त जागांच्या 20% प्रमाणे अनुकंपा यादीतील सेवा ज्येष्ठता व शिक्षण अहर्ताप्रमाणे झेडपीच्या माजी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना संधी मिळणार आहे. 50 ते 100 च्यावर पाल्यांना संधी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सात वर्षानंतर अनुकंपा भरती होणार असल्याने झेडपीच्या प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी भरतीची मोठी तयारी केली आहे. सेवा जेष्ठतेप्रमाणे निवड झालेल्या वाल्यांना झेडपीत कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. त्यामुळे यापूर्वी झेडपी कर्मचारी असलेले व सेवेवर मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना कुटुंब उभारणीसाठी कायमस्वरूपी आधार मिळणार आहे. सीइओ जंगम यांच्यामुळे न्याय मिळणार असल्यामुळे या पाल्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काटेकोर व पारदर्शकपणे ही भरती होणार आहे. यासाठी कोणी इतरांना भेटू नये. काही शंका किंवा अडचणी असल्यास सभागृहात थेट सीईओ किंवा माझ्याशी संपर्क साधावा.

स्मिता पाटील, 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशासन विभाग 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button