सोलापूर : जिल्हा परिषदेमध्ये साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची 105 वी जयंती जिल्हा परिषदेमध्ये साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे,समाजकल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, राज्य उपाध्यक्ष गिरीष जाधव, कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष दिनेश बनसोडे, कास्ट्राईब संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर, प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे, सहा लेखाधिकारी उमाकांत राजगुरु, प्रशासन अधिकारी सचिन सोनकांबळे, विस्तार अधिकारी मनोज म्हेत्रे, संतोष जाधव, रामदास गुरव, भीमाशंकर कोळी, शंकर चलवदे,सुशीत चाबुकस्वार, मकरंद बनसोडे, प्रणेश ओव्हाळ व सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कस्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना
कास्ट्राईब संघटनेच्यावतीने जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे व जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर यांचेहस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले
याप्रसंगी संघटनेचे कार्याध्यक्ष उमाकांत राजगुरू, सरचिटणीस धन्यकुमार राठोड, बी के चव्हाण, संतोष जाधव रामदास गुरव, मकरंद बनसोडे, देविदास म्हेत्रे, राजू गाडपल्ली, मनोज म्हेत्रे, सचिन सोनकांबळे, शिवाजी हुलसुरे, महेंद्र माने आदिसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते


More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी