सोलापूर : जिल्ह्यात मागील महिन्यापासून जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांच्या लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे. लंपी आजार संसर्गजन्य असल्याने त्याच्या प्रतिबंधासाठी सर्व पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, त्याबरोबरच जनावरांची तसेच गोठ्याची स्वच्छताही करावी, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून 1544 गाय वर्ग पशुधन लंपी आजारामुळे बाधित झालेले आहे, त्यापैकी 1108 जनावरे बरी झाली असून आत्तापर्यंत 33 जनावरांचा लंपी आजारामुळे मृत्यू झालेला आहे. तर 403 जनावरावर उपचार सुरू आहेत. प्रशासनामार्फत लंपी आजार प्रतिबंधासाठी जनावरांना लस देण्यात येत आहे. लस खरेदीसाठी जिल्हा परिषदेच्या स्व निधी मधून 15 लाखाचा निधी मंजूर केलेल्या होता, त्यातून लस खरेदी केलेली असून लसीकरण मोहीम वेगाने सुरू असल्याची माहिती जंगम यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे, त्याबरोबरच जनावरांची स्वच्छता तसेच गोठ्यांची स्वच्छताही ठेवावी. हा आजार संसर्गजन्य असल्याने अधिक काळजी घेणे गरजेचे असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी यावेळी सांगितले.

More Stories
सोलापुरात सायबर पोलिसांचा छापा: आयटी कंपन्यांना फसविणारे मोठे रॅकेट उघड
विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर
डॉ. सतीश कोपूरवाड यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या आरोग्याची धुरा