सोलापूरमहाराष्ट्र

कलेक्टर दिलीप स्वामी यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले कौतुक

सोलापूर : छत्रपती संभाजीनगरचे कलेक्टर दिलीप स्वामी यांच्या विविध उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कौतुक केले आहे.

दि. 2 व 3 ऑगस्ट रोजी नागपूर येथे जिल्हाधिकाऱ्यांची दोन दिवसाची कॉन्फरन्स झाली. या कॉन्फरन्सच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव उपस्थित होते. या मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पदभार घेतल्यापासून राबविलेल्या विविध उपक्रमाचे वैयक्तिक सादरीकरण केले.जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम सादर करतानाचया  येणाऱ्या अडचणी पण सांगितल्या. छत्रपती संभाजीनगरने महसूल विभागात राबविलेल्या या सर्वच नाविन्यपूर्ण उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री बावनकुळे यांनी कौतुक केले.

कलेक्टर स्वामी यांनी या सर्व उपक्रमाचे श्रेय छत्रपती संभाजीनगर महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. भविष्यात आणखी खूप काम करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्यामुळे आपणा सर्वांनाच खूप मेहनत करावी लागणार आहे. नियोजनबद्ध काम करावे लागणार आहे. संपूर्ण यंत्रणा अँक्टिव्ह करावी लागणार आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी स्वामी यांनी कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button