February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी, कर्मचारी सामुहिक रजा आंदोलनाला यश

सोलापूर : शिक्षणसेवा राजपत्रित अधिकारी कर्मचारी सामुहिक रजा आंदोलनाला यश आलेेे आहे. संघटनेच्या पदाधिकारी व सर्व शिक्षणसंचालक, सहसंचालक यांची शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, प्रधानसचिव रनजितसिंह देओल यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झालेली असल्याने आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आज झालेल्या बैठकीमध्ये पुढील महत्त्वाच्या  मुद्द्यांवर चर्चा झाली. नागपूर विभागासह सर्व बोगस शालार्थ प्रकरणांची चौकशी दि. ०७.०८.२०२५ च्या शा.नि. व्दारे गठित केलेल्या विशेष चौकशी समितीकडे वर्ग करावी. विना चौकशी कोणत्याही अधिकारी कर्मचारी यांना नियमवाह्य अटक करू नये. शालार्थ प्रकरणी निलंबित झालेले सर्व अधिकारी यांना सेवेत पुनर्स्थापित करण्यात यावे. अतिरिक्त कामांचा ताण, वेळे व्यतेनिरिक्त होणाऱ्या V.C. याबाबतही चर्चा झाली.या सर्व मागण्याबाबत  मंत्री भुसे व प्रधानसचिव देओल यांनी ठोस आश्वासन संघटना प्रतिनिधी यांच्यासोबत मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले आहे.

संघटनेच्या सर्व न्याय मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल,तसेच संघटनेच्या मागण्यांचे निवेदनाबाबत पोलीस विभागाला शासन स्तरावरून कळवण्यात येणार आहे. कोणत्याही निरपराध अधिकारी, कर्मचारी यांच्यावर चुकीची कारवाई होणार नाही अशा प्रकारचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी दिलेले आहे. त्यामुळे संघटनेचे दि. ८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू असलेले सध्याचे बेमुदत सामुहीक रजा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.

यापुढे अशप्रकारची ‍ विनाचौकशी नियमबाह्य पद्घतीने अटक झाल्यास कोणतीही पूर्व सूचना न देता स्तगित केलेले आंदोलन पुन्हा सुरू केले जाईल. त्यामुळे सर्व शिक्षणसेवा राजपत्रीत अधिकारी कर्मचारी यांनी बुधवार दिं. १३.८.२०२५ पासून पूर्ववत कामावर रूजू व्हावे असे आवाहन अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संधाच्यावतीने करण्यात येत आहे.