सोलापूर : जलजीवन मिशनच्या कामाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर घेतलेली बैठक राज्याला दिशा देणारी ठरली आहे.
सध्या राज्यातील अत्यंत महत्वाचा विषय असलेला हर घर जल या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातमध्ये या योजनेअंतर्गत कामे २०२२-२३ पासुन सुरु झाली,यामध्ये घरात बसुन या योजनांचे अंदाजपत्रक करणारी प्रायव्हेट कन्सल्टन्सी कंपनी व या कामावर लक्ष देणारी खासगी कंपनीमुळे ही योजना व या योजनांमुळे राज्य अडचणीत आले आहे.
यामध्ये कंत्राटदार यांची प्रलंबित देयके व इतर अनेक कामासंदर्भात अडचणी प्रत्यक्षात येत आहेत. यावर उपाय योजना करण्यासाठी मंगळवार दि १२ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी संबंधित या विभागांशी निगडित सर्व अधिकारी बोलवले होते. तसेच महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या बैठकीस महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे राज्य अध्यक्ष इंजि मिलिंदजी भोसले उपस्थित होते .
या बैठकीला खालील पाच विषयांवर जवळपास एकमत होऊन हे विषय तातडीने तडीस नेण्याचे अंतिम केले आहे. जिल्हामधील सर्व या योजनांच्या कंत्राटदार यांचे कामांना विनादंड मुदतवाढ देण्यासाठी शासनाकडून मंजूर करुन निर्णय घेणार आहे. कंत्राटदार यांचे बिल जर प्रलंबित असेल तर संबंधित कामांचे अनामत रक्कम,अतिरिक्त सुरक्षा रक्कम व इतर रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला जाईल. कामे पुर्ण केल्यानंतर ही कामे ग्रामपंचायत हस्तांतरित करुन घेत नाही याऐवजी आता स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद प्रशासन मैदानात उतरुन हस्तांतरित करून घेईल.काम केल्याबरोबर २१ दिवसांच्या आत स़बधीत विभागाने कंत्राटदार यांचे देयके mb मध्ये लिहुन सविस्तर बिल तयार करणे. प्रलंबित कंत्राटदार यांचे बिलांची सविस्तर यादी कार्यालयात न ठेवता जिल्हा परिषदेच्या ठळक बोर्डावर पाहण्यासाठी ठेवणार. यामध्ये रोज यादी अपडेट करणार तसेच शासनाकडून निधी जिल्हा परिषदेस प्राप्त झाल्यानंतर सदर निधी सगळ्या कंत्राटदार यांना समप्रमाणात वाटप करण्यात येणार आहे .
अशा महत्वाच्या पाच बाबीवर निर्णय झाला आहे. ही बैठक जवळपास सविस्तर दीड तास झाली. यापुढे या योजनांचे सर्व कार्यपद्धती व नियम, सर्व योजनाचा प्रशासनाचा ताबा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वताकडे ठेवून जी पारदर्शकता या योजनांसाठी पाहिजे आहे ती सर्व करण्यासाठी कटिबद्ध आहे हे बैठकीतुन व संभाषणातून दाखवुन दिले आहे. येणार्या काळात ही बैठक व या बैठकमधील झालेले ठराव, कार्यपद्धती ही महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या विभागासाठी दिशा देणारी ठरणार आहे,हे नक्कीच जाणवत आहे. या बैठकीस सोलापूर जिल्हा पाणीपुरवठा संघटनेचे अध्यक्ष आनंद तोडकरी, सचिव विवेक राठोड, उपाध्यक्ष हेमंत जाधव, खजिनदार श्रीकांत सोनी, राज्य कार्यकारिणी सदस्य सुर्यकांत बिराजदारसह अनेक संघटनाचे संचालक उपस्थित होते.

More Stories
सोलापूरची ६० वर्षांची प्रतीक्षा संपली; सोलापूरकरांना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची भेट
जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी पुरवणी परीक्षेच्या तारखा जाहीर
सोलापूर झेडपीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलल्या