सोलापूरजिल्हा परिषदसंघटना-संस्था

झेडपीतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एच आर पॉलिशी राबवा

नवी दिल्ली : देशातील पाणी व स्वच्छता क्षेत्रात जिल्हा, तालुका व गाव पातळीवर काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्रीय जलशक्ती विभागाचे मंत्री सी. आर. पाटील यांना स्वच्छ भारत मिशन ग्रामीण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव महाराष्ट्र व जलजीवन मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष नवनीत कुमार सारस्वत (राजस्थान) यांच्याहस्ते पंढरपूरच्या विठुरायाची आठवण करून देेणारी विणा व प्रसाद भेट देऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.

या प्रसंगी संघटनेचे राष्ट्रीय सचिव शंकर बंडगर, महासचिव कोसलेंद्र सिंग प्रमुख उपस्थित होते. केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात स्वच्छता व पाणीपुरवठा विभागात काम करणाऱ्या देशातील सर्व कर्मचारी यांचे साठी एचआर पाॅलिशी राबविन्यात यावी. यात काम करणारे कर्मचारी यांचेसाठी नोकरीत संरक्षण द्यावे. जिल्हा व तालुका स्तरावर काम करणारे कर्मचारी यांना समान काम, समान वेतन देणेत यावे. पाणी व स्वच्छता क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांचेसाठी विमा सुरक्षा देणेत यावी. १० वर्षे पेक्षा अधिक वर्षे सेवा केलेले कर्मचारी यांना सेवेत कायम करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचे दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करणेबाबत राज्यांना सुचना देणेत यावी. राज्यांना प्रशासकीय खर्चासाठी प्रकल्पाचे ५ टक्के निधी देणेत यावा. राज्यात सुरू असलेले आऊटसोर्सिंग थांबविणेत यावे. राज्य व जिल्हास्तरावर काम करणारे कर्मचारी तसेच तालुकास्तरावर काम  करणारे कर्मचारी तसेच जिल्हा व विभागस्तरावर पाणी गुणवत्ता व प्रयोगशाळा कर्मचारी, जल सुरक्षक यांचे मानधनात वाढ करणेसाठी केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोनती अभियानाच्या धर्तीवर एच आर पाॅलिसी राबविणेत यावी. आदी विविध मागण्या करन्यात आल्या. हरियाना, उत्तर प्रदेश, हिमाचल, ओरिसा, कर्नाटक, त्रिपुरा आदी राज्यात पाणी व स्वच्छता क्षेत्रातील कर्मचारी यांचेवर होत असलेला अन्याय दूर करन्यात यावा. देशपातळीवर दिल्ली येथे स्वच्छता, पाणी व पाणी गुणवत्ता संमेलन घेऊन अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यथा जाणून घ्याव्यात अशीही मागणी करणेत आली.

देश पातळीवर पाणी व स्वच्छता व पाणी गुणवत्ता क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांचेसाठी संघटन तयार करणेत आले आहे. आज केंद्रीय मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेतली. त्यांनी अडचणी जाणून घेतल्या. देशभरातील कर्मचारी यांचेसी संवाद साधण्याचे अभिवचन दिले. त्याचबरोबर एच आर पाॅलिसीमुळे देशात समान काम, समान वेतनाची प्रभावी अंमलबजावणी होणार आहे, असेही राष्ट्रीय अध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले. महाराष्ट्रातून कृती समितीचे उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत (सातारा), बीआरसी सीआरसी संघटनेचे विलास निकम उपस्थित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button