सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर बचत गटाचे डाळिंब इराणला; पालकमंत्री गोरे यांनी केले कौतुक

सोलापूर : महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे.महिला बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येवुन स्थापन केलेल्या माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने डाळिंबाची होत असलेली निर्यात ही निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्यावतीने माढा तालुक्यातील माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीने १४ टन डाळिंब हे इराण व इराक या देशात निर्यात करण्यात आले.यावेळी महिलांना मार्गदर्शन करताना ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, उमेद अंतर्गत सोलापूर जिल्हयाचे कामकाज उल्लेखनीय असून उमेद अंतर्गत महिलांना कोणतीही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी मी निश्चित मदत करण्यास कटीबद्ध आहे तसेच भविष्यात कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतमाल निर्यात करून कंपनीने आर्थिक सक्षम व्हावे. तसेच उमेद अंतर्गत महिलांनी बनविलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत प्रत्येक जिल्हयात उमेद मॉल उभारण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सदर माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या पदाधिकारी यांचे कौतुक करून त्यांचा सन्मान केला.

यावेळी आ.देवेंद्र कोठे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, राहुल जाधव, दयानंद सरवळे, मिनाक्षी मडवळी, अनिता माने, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख,कंपनीच्या अध्यक्षा राणी कुंभार, सचिव अर्चना कदम, संचालक सुनीता गोसावी, तनुजा तांबोळी उपस्थित होते.

   शेतमाल निर्यात करण्यासाठी व महिलांनी एकत्रित येऊन खरेदी केलेल्या शेतमाल यांना चांगला दर मिळणार असल्याचे कंपनीला चांगला नफा मिळणार आहे. तसेच यामुळे महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे. तसेच सदर माढेश्वरी महिला शेतकरी उत्पादक कंपनीला मूल्यवर्धन साखळी अंतर्गत मोरींगा प्रक्रिया उद्दोगासाठी प्रकल्प मंजुर आहे. त्यामुळे कंपनीच्या माध्यमातून भविष्यात महिलांना व्यवसायासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे….

-कुलदीप जंगम,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

जिल्हा परिषद सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button