सोलापूर: मोदी परिसरातील रास्त भाव धान्य दुकानात गुरुवारी ग्राहकांना धान्य वाटपावेळी ड – २५ या रास्त भाव धान्य दुकानात तांदूळ पोत्या मध्ये मृत सापाचे अवशेष सापडल्याने नागरिकात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची अन्नधान्य वितरण कार्यालयाने गंभीर दखल घेत शुक्रवारी दुकानाचा पंचनामा केला व दुकानदार चालवणाऱ्या सोसायटीला परवाना रद्द करण्याबाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
सोलापुरात काही दिवसापूर्वीच मोदी परिसरात दुषित पाण्यामुळे दोन जणांना जीव गमववा लागला. आता पुन्हा वादग्रस्त असलेल्या रेशन प्रणालीतून चक्क तांदळात मृत सापाचे अवशेष सापडल्याने मोदी परिसरात नागरिकांत भयभीत वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत नागरिकांनी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांना तक्रार केली असता, अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी तात्काळ पथक पाठवून त्या ठिकाणाची चौकशी व त्या तांदळाचे सॅम्पल ताब्यात घेऊन त्याची तपासणी करण्याकरिता प्रयोगशाळेकडे पाठवून देण्यात आले. तसेच संबंधित दुकानातील धान्याचा पंचनामा करून त्या भागातील नागरिकांची चौकशी व जाबजबाब नोंदविण्यात आले. संबंधित दुकानदाराने याबाबत प्रतिक्रिया देताना धान्य गोडांऊनमधून ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे नागरिकांना वाटण्यात आले असे कळविले आहे. पण प्रत्यक्षात नियमाप्रमाणे रेशन दुकानात धान्य आल्यानंतर त्याचा पंचनामा करून ग्राहकांसाठी दर्शनी भागात असलेल्या काचेच्या भरणीत त्याचे सॅम्पल ठेवावे लागते.पण तसे न करता संबंधित दुकानदाराने याकडे डोळेझाक करून अतिशय निष्काळजीपणे धान्य वाटप केले आहे. याबाबत नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित दुकानदारास नोटीस बजावली असून 24 तासात त्याचे उत्तर देण्याबाबत कळविले आहे. एकंदरीत अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या भागात असे निष्काळजीपणाने धान्य वाटप झालेल्या रेशन दुकानावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. इतक्या बेफिकीरपणाने रेशन मधील धान्य वाटप करून सामान्य लोकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार होत असल्याबाबतही नागरिकांनी चिंताजनक भावना व्यक्त केलेल्या आहेत.आता संबंधित दुकानदारावर अन्नधान्य वितरण अधिकारी काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
दुकानदारला बजावलेली नोटीस…


More Stories
सोलापूरच्या वाहन मालकाकडून 35 हजाराची लाच घेताना पुण्याचा फौजदार अटकेत
युरोपमधील “पॅरिसमहल’ मध्ये शेतकऱ्यांनी साजरी केली शिवजयंती
सोलापूर महापालिकेत सत्तेत आलेल्या भाजपाला पहिल्याच सभेत नामुष्की