सोलापूरजिल्हा परिषदमहाराष्ट्र

अभिनंदन.. मंद्रूप ग्रामपंचायतने पटकावला आणखी एक मानाचा पुरस्कार

सोलापूर : माझी वसुंधरा अभियानात राज्यात प्रथम क्रमांक पटकावलेल्या दक्षिण सोलापूरतील मंद्रूप ग्रामपंचायतने आणखी एक मानाचा पुरस्कार पटकावला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत पर्यावरण व हवामान बदल विभागाचे मिशन डायरेक्टर सुधाकर बोबडे यांनी मंद्रूप ग्रामपंचायतला हरित यशोगाथा सन्मान 2025 मिळाला असल्याचे कळवले आहे.

माझी वसुंधरा उपक्रमाअंतर्गत युनिसेफच्या मदतीने राज्यभरात पर्यावरण पूरक उपक्रम राबविलेल्या ग्रामपंचायती व संस्थांचा सन्मान केला जातो. महाराष्ट्र शासनाच्या माजी वसुंधरा उपक्रमात मंद्रूप ग्रामपंचायतीने यापूर्वी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पुरस्काराची दखल घेत हरित यशोगाथा सन्मान 2025 या कार्यक्रमात ही मंद्रूप ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. 14 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबाबत मंद्रूपचे सरपंच अनिता कोरे व ग्रामसेवक नागेश जोडमोठे यांना कळविण्यात आले आहे. सलग दुसऱ्यांदा मंद्रूप ग्रामपंचायतने असा सन्मान मिळवल्याबद्दल मंद्रूप ग्रामस्थांचे राज्यभरात अभिनंदन होत आहे. मंद्रूप ग्रामपंचायतच्या या यशाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी मनोज राऊत, जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती आप्पाराव कोरे यांनी अभिनंदन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button